HW News Marathi
महाराष्ट्र

डॉक्टर दिनाच्या दिवशीच डॉक्टर दाम्पत्याची आत्महत्या

पुणे । आज १ जुलै, राष्ट्रीय डॉक्टर्स डे संपूर्ण देशात साजरा केला जात आहे. कोरोनाच्या कठीण काळापासून ते आत्तापर्यंतही डॉक्टर्सनी आपल्या जीवाची काळजी न करता दुसऱ्यांचे प्राण वाचवले आहेत. त्यांच्या अहोरात्र मेहनतीचे जगभरातून कौतुक केलं जात आहे. असं असताना आज डॉक्टर्स दिनाच्या दिवशी एक दुख:द घटना घडली आहे. पुण्यात डॉक्टर पती-पत्नीने गळफास लावून आत्महत्या केली आहे. या घटनेने संपूर्ण पुणे हादरलं आहे.

पुणे शहरातील वानवडीमधील आझादनगर परिसरात राहत्या घरात एका पाठोपाठ एक गळफास घेऊन डॉक्टर दाम्पत्याने आत्महत्या केली. डॉ. अंकिता निखिल शेंडकरआणि डॉ. निखिल दत्तात्रय शेंडकर असे आत्महत्या केलेल्या डॉक्टर दाम्पत्याचे नाव आहे. २६ वर्षीय डॉक्टर पत्नीच्या आत्महत्येनंतर २८ वर्षीय डॉक्टर पतीनेही आयुष्य संपवलं आहे. दोघांच्या आत्महत्येचं नेमकं कारण मात्र अद्यापही अस्पष्ट आहे. दरम्यान, राष्ट्रीय डॉक्टर दिनीच ही घटना उघडकीस आल्यानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

नेमकं काय घडलं?

बुधवार ३०जून रोजी रात्री आठ वाजताच्या सुमारास वानवडी पोलिस चौकीचे अंमलदार इनामदार यांना डॉ. अंकिता शेंडकर यांनी वानवडी येथील राहत्या घरी पंख्याला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतल्याची माहिती मिळाली. त्यांना उपचारासाठी ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेला काहीसा कालावधी लोटत नाही.

तोपर्यंतच त्यांचे पती डॉ. निखिल शेंडकर यांनी आज सकाळी सात वाजताच्या सुमारास ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन केली आत्महत्या केली. दोघांनी कोणत्या कारणातून आत्महत्या केली हे मात्र समजू शकले नाही. याबाबत पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दोघांच्या आत्महत्याच नेमकं कारण काय हे अद्याप स्पष्ट नसून पोलीस त्याचा तपास करत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भांड्याला भांड लागणारच, आम्ही समन्वयातून मार्ग काढू ! राऊतांच्या संतापानंतर जयंत पाटलांची प्रतिक्रिया

News Desk

ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार, उद्या ‘हे’ मंत्री घेणार शपथ

News Desk

घराघरात जाताय? जा जा, मुंबईकर तुमची वाटच पाहत आहेत – आशिष शेलार 

News Desk