HW News Marathi
महाराष्ट्र

अमेरिकेहून मुलगी परतल्याची माहिती लपवली, तरीही लहान बाळांवर केले डॉक्टरांनी उपचार

पनवेल | कोरोनाची लागण झाली आहे किंवा प्रवास करुन आले असले तरी त्या लपवण्याच्या घटना अनेक ठिकाणी घडत आहेत. असाच आणखी एक प्रकार नवी मुंबईत घडला आहे. साई बाल रुग्णालयाचे प्रमुख डॉक्टर महेश मोहिते यांनी त्यांची मुलगी अमेरिकेतून परत आली होती हे लपवले. त्यामूळे पोलिसांनी त्यांचे रुग्णालय सील करण्यात आले आहे.

नवीन पनवेलमधील सेक्टर-१९ मध्ये साई बाल रुग्णालय आहे. हे रुग्णालय डॉक्टर महेश मोहिते चालवतात. त्यांची कन्या अमेरिकेहून परत आली होती. त्यामूळे शासनाच्या निर्देशानुसार तीने १४ दिवस क्वॉरंटाईनमध्ये राहणे आवश्यक होते. परंतू, तसे केले नाही तसेच मुलीच्या सानिध्यात असतानाही त्यांनी रुग्णालयात लहान मुलांवर उपचार केले होते. याची माहिती कळताच पनवेल मगापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी नोटीस पाठवत रुग्णालय बंद ठेवण्याचे आदेश दिले. तसेच, त्यांनी कोणकोणत्या लहान बाळांवर उपचार केले आणि कोणाच्या संपर्कात आले याची माहिती पोलिस घेत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशातील कोरोना परिस्थिती हाताळण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी सपशेल अपयशी ठरले आहेत – नाना पटोले

News Desk

देवेंद्र फडणवीसांनंतर एकनाथ खडसे शरद पवारांच्या भेटीसाठी, राजकीय वर्तुळात खळबळ

News Desk

ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते ३ हजार ९४३ जि.प. प्राथमिक शिक्षकांचे बदली आदेश जारी

Aprna