HW News Marathi
महाराष्ट्र

स्त्रीभ्रूण हत्या प्रकरणातील आरोपी डॉक्टर सुदाम मुंडेचा पुन्हा बेकायदेशीर दवाखाना सुरू

बीड | बेकायदा गर्भपात प्रकरणात शिक्षा झालेल्या आणि सध्या जामिनावर असलेल्या सुदाम मुंडेंने परळी तालुक्यात पुन्हा बेकायदा दवाखाना थाटला आहे. या प्रकरणी डॉ सुदाम मुंडे पोलिसांच्या ताब्यात आहेत. परळी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्याचे काम सुरू आहे. सुदाम मुंडे कोरोना सदृश्य रुग्णावर बेकायदेशीर उपचार करत होते. विशेष म्हणचे चार ते पाच रुग्ण त्यांच्या बेकायदेशीर रुग्णालयात उपचार घेत होते. गर्भपाताला लागणारे साहित्य पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

परळीतील उच्चशिक्षित असलेले सुदाम मुंडे आणि सरस्वती मुंडे हे डॉक्‍टर दांपत्य आर्थिकदृष्ट्याही सक्षम होते. पत्नी डॉ. सरस्वती स्त्रीरोग तज्ज्ञ, डॉ. सुदाम स्त्रीरोग आणि अस्थिरोग शल्यचिकित्सक असा दुहेरी पदवीधारक होता. परळीतील मोजक्‍या स्त्रीरोग तज्ज्ञांपैकी असल्याने या दाम्पत्याचा वैद्यकीय व्यवसायही जोरात होता. त्यातच बसस्थानकासमोर असल्याने त्याचे रुग्णालय गजबजलेले असायचे. यातून मिळणाऱ्या पैशांवर समाधानी नसलेल्या या दाम्पत्याने पेशाला काळीमा फासायला सुरवात केली आणि बेकायदा गर्भलिंगनिदान, गर्भपात सुरू केले.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

बीड जिल्ह्यातील परळी इथल्या डॉ. सुदाम आणि सरस्वती मुंडे यांच्या मुंडे हॉस्पिटलमध्ये 18 मे 2012 रोजी विजयमाला महादेव पटेकर या महिलेचा गर्भपातादरम्यान मृत्यू झाला होता. याप्रकरणी आरोपी डॉक्टर दाम्पत्यावर गुन्हा दाखल झाला होता. मात्र दोघेही फरार झाले होते. यानंतर परळी न्यायालयाने दोघांनाही 3 जुलैपर्यंत कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले होते. अन्यथा सीआरपीसी कायदा 83 नुसार संपत्ती जप्तीची कारवाईचा इशारा दिला होता.

हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेनं मुंडे दाम्पत्याचा परवाना कायमचा रद्द केला होता. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी या दाम्पत्याला जामीन मंजूर झाला होता. मात्र सामाजिक संघटनांनी आंदोलनं करुन जामीन रद्द करण्याची मागणी केली.

यानंतर मुंडे दाम्पत्य स्वत: पोलिसात हजर झालं होतं. त्यांच्यावर खटला चालल्यानंतर 2015 मध्ये कनिष्ठ न्यायालयाने त्यांना 4 वर्षे कैद आणि 80 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर हा खटला जिल्हा न्यायालयात सुरु होता. जिल्हा सत्र न्यायालयाने मुंडे दाम्पत्याला 10 वर्षांची शिक्षा सुनावली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठा विद्यार्थ्यांचा प्रश्न युद्ध पातळीवर सोडविण्याचा प्रयत्न करू | संभाजी महाराज

News Desk

बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू करण्याबाबत बैठक पार पडली, शर्यत पुन्हा सुरू करण्याची मालकांची मागणी

News Desk

संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातील हुतात्मा वीरांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिवादन

News Desk