पुणे | महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा ३२०२ इतका झाला आहे. पुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा ही वाढत चालला आहे. पुण्यातील शिक्रापूरमध्ये गरोदर महिलांची सोनोग्राफी करणाऱ्या डॉक्टरला कोरोनाची लागण झाल्याने ६२ गरोदर महिलांना क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. या महिला ६-८ एप्रिल या कालावधीत या डॉक्टरकडे सोनोग्राफीसाठी गेल्या होत्या.
दरम्यान, या कोणत्याही गरोदर महिलेला कोरोना सदृश्य लक्षणे आढळली नाही आहेत. याची अधिक माहिती पुणे जिल्हा परिषदेचे सीईओ ए.प्रसाद यांनी दिली आहे. शिक्रापूरमधील या सोनोग्राफी सेंटरमध्ये ६९ महिलांची सोनोग्राफी करण्यात आली होती. या महिलांना ४ हॉटेलमध्ये क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. तसेच, त्यांचे नमुने पुण्याच्या एनआयव्हीला तपासासाठी पाठवण्यात आले आहे.
62 pregnant women from Shikrapur put under institutional quarantine after they came in contact with a sonographer who has tested positive for COVID19. These women came in contact with him b/w 6-8 Apr. None of the women have any COVID19 symptoms: A Prasad, Zila Parishad CEO, Pune pic.twitter.com/VJOm7c6gaf
— ANI (@ANI) April 16, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.