HW Marathi
महाराष्ट्र मुंबई राजकारण

खासगी रुग्णालयात रुग्णांवर उपचार करण्यास टाळाटाळ केल्यास कारवाई होणार

मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देश जरी लॉकडाऊन असला तरी अत्यावश्यक सेवा हा सुरुच आहेत. जिल्ह्यातील, शहरांतील सरकारी, खासगी सर्व रुग्णालये आणि त्यातील कर्मचारी रुग्णांची सेवा करत आहेत. यात जर खाजगी डॉक्टरच्या ओपीडी अथवा रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना सेवा देण्याचे नाकारल्यास संबंधित रुग्णालयाचा परवाना रद्द करण्यात येईल आणि कारवाई केली जाईल, असा इशारा राज्याचे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिला आहे.

दरम्यान, या संदर्भातील प्रसिद्धीपत्रकंच आरोग्य राज्यमंत्र्यांनी काढले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस आणि तासागणिक वाढतच आहे. शासकीय आरोग्य यंत्रणा सर्वतोपरी या संकटाला आळा कसा घालता येईल यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. तसेच, खासगी क्षेत्रातील अनेक डॉक्टर्स आणि रुग्णालये सरकारला मदत करत आहेत. मात्र, काही डॉक्टर्स व खासगी रुग्णालये त्यांच्या ओपीडीमध्ये येणाऱ्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी टाळाटाळ करत असल्याच्या तक्रारी शासनाकडे आल्या.

खरंतर आरोग्याच्या दृष्टीने ही सगळ्यात मोठी आणीबाणी देशावर आलेली आहे. अशा काळात सर्व घटक देशसेवा ढटून काम करत आहेत. परंतू, देशासमोरील या संकटाला सामोरे जात असताना आरोग्य क्षेत्रातील काही मोजकी मंडळी रुग्णसेवा नाकारत असल्याच्या तक्रारी येत आहेत. या क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वच डॉक्टर्स आणि रूग्णालयाच्या विश्वस्तांनी आपल्या रुग्णालयात येणाऱ्या सर्व प्रकारच्या रुग्णांना तपासले पाहीजे असे आवाहन राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केले आहे.

Related posts

नॉट रिचेबल ! धनंजय मुंडे राष्ट्रवादीच्या बैठकीसाठी दाखल

News Desk

16 वर्षाच्या मुलाने केला ११ वर्षाच्या मुलावर बलात्कार

News Desk

मी अभ्यंगस्नानानंतर फटाके वाजवण्याची परंपरा मोडणार नाही | आव्हाड