HW News Marathi
महाराष्ट्र

Dongri Building Collapsed : सरकारकडून मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची आर्थिक मदत

मुंबई | मुंबईतील डोंगरी येथील केसरबाई ही ४ मजली इमारती कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत तब्बल १३ जणांचा मृत्यू झाला असून ९ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेतील मृत आणि जखमींना आर्थिक मदत आणि वैद्यकीय खर्च देणार’ असल्याची घोषणा केली आहे. राज्य सरकारकडून या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख, तर जखमींना ५० हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. त्याचप्रमाणे, या दुर्घटनेतील जखमींना सर्व वैद्यकीय खर्च देण्यात येणार असल्याचे देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.

डोंगरी येथे ‘केसरबाई-१’ या ४ मजली अधिकृत इमारतीच्या मागच्या बाजूस ‘केसरबाई-२’ ही अनधिकृत इमारत उभारण्यात आली होती. मंगळवारी (१६ जुलै) सकाळी या इमारतीचा काही भाग कोसळला. प्राथमिक अंदाजानुसार या कोसळल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली तब्बल ४० ते ५० जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. या दुर्घटनेनंतर तातडीने पोलिस, अग्निशमन जवान आणि ‘एनडीआरएफ’च्या जवानांकडून बचावकार्यास सुरुवात झाली. दरम्यान, आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार या इमारत दुर्घटनेत १३ जणांचा मृत्यू झाला असून ९ जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्य सरकारकडून अनलॉक-६ च्या गाईडलाईन्स जारी

News Desk

गोपीचंद पडळकर यांच्या विरुद्ध शरद पवारांवर जहरी टीका केल्याप्रकरणी आणखी एक तक्रार दाखल

News Desk

राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी सावधगिरी बाळगावी! – दिलीप वळसे पाटील

Aprna