HW Marathi
Covid-19 महाराष्ट्र राजकारण

तुमच्या जिवापेक्षा मला अधिक मोलाचे काहीच नाही | राज ठाकरे

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा १४ जून रोजी वाढदिवस आहे. या निमित्ताने राज ठाकरे  यांनी मनसे कार्यकर्त्यांशी पत्राद्वारे संवाद साधत त्यांना आवाहन केले आहे. “मला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला येऊ नका. तुम्ही जिथे आहात तिथे जनतेला मदत करा, दिलासा द्या, याच माझ्यासाठी शुभेच्छा आहेत. पण हे करताना तुम्ही तुमच्या आणि कुटुंबाच्या जीवाची काळजी घ्या, तुमच्या जिवापेक्षा मला अधिक मोलाचे काहीच नाही,” असे आवाहन त्यांनी मनसे कार्यकर्त्यांना केले आहे.

राज ठाकरे म्हणाले, “माझ्या वाढदिवशी तुम्ही सगळे दरवर्षी मला शुभेच्छा द्यायला येता, पण या वर्षीची परिस्थिती वेगळी आहे. कोरोनामुळे अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. थोडक्यात सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. अशा वातावरणात वाढदिवस साजरा करणे अजिबात उचित नाही. म्हणूनच पक्षातील सर्व पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिकांना माझ्या सूचनावजा आदेश आहेत की कोणीही मला शुभेच्छा द्यायला येऊ नका,” असे ते म्हणाले.

“कोरोनाच्या कठीण प्रसंगात महाराष्ट्र सैनिक जीवावर उदार होऊन, मोठ्या प्रमाणात पदरमोड करुन लोकांच्या मदतीला धावून जात आहे. अन्नधान्य वाटपापासून ते रुग्णांना इस्पितळात बेड मिळवून देणारा, रुग्णांच्या कुटुंबियांना धीर देऊन प्रत्येकाच्या गरजेला उभा राहणारा. माझ्या महाराष्ट्र सैनिकांच्या बातम्या माझ्यापर्यंत पोहचायच्या आणि त्या ऐकताना मला एकाच वेळेस आनंद आणि अभिमान दोन्हीही रहायचा. मी खरंच भाग्यवान आहे की मला तुमच्यासारखे सहकारी मिळाले,” असे राज ठाकरे म्हणाले

 

Related posts

भाजपच्या ‘संकल्प पत्र’तील महत्त्वाचे मुद्दे

News Desk

Union Budget 2021 |  जुन्या वाहनांचा फिटनेस आता तपासला जाणार

News Desk

“आज मला शरद पवारांची खुप आठवण येतेयं…”

News Desk