HW News Marathi
Covid-19

विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून वैद्यकीय परीक्षा घेऊ नका, अमित देशमुख यांची सूचना

मुंबई | राज्यातील वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांबाबत राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी एक महत्त्वपूर्ण भूमिका घेतली आहे. “सध्याची कोरोनास्थिती लक्षात घेता विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा न घेता पुढे अनुकूल वातावरण निर्माण होताच परिसखा घेण्यात याव्यात”, अशा सूचना अमित देशमुख यांनी कुलगुरु डॉ. दिलीप म्हैसेकर यांना दिल्या आहेत. दरम्यान, कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांच्या परीक्षांसंदर्भातील निर्णय हा अगदी कळीचा मुद्दा ठरला आहे.

अमित देशमुख यांनी याबाबतच्या सविस्तर सूचना देताना असे म्हटले आहे कि, “आताच्या स्थिती विद्यार्थ्यांच्या जीव धोक्यात न घातला अनुकूल परिस्थितीत वैद्यकीय विद्यार्थ्यांचा परीक्षा घ्याव्या. पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षाच्या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्षीचा अभ्यासक्रम शिकवण्यास सुरुवात करण्यात यावी. तसेच, पुढील सूचनेपर्यंत सर्व नॉन सर्टिफाइंग परीक्षा पुढे ढकलण्यात याव्या. त्याचप्रमाणे, अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील शिक्षणासाठी अडथळा निर्माण होऊ नये म्हणून या विद्यार्थ्यांची इंटर्नशिप सुरु करण्यात यावी.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अर्णब गोस्वामी अडचणीत ! आता CID करणार ‘त्या’ आत्महत्या प्रकरणाची चौकशी

News Desk

शरद पवार, उध्दव ठाकरे, अजित पवारांचे फोटोज मॉर्फ केल्याप्रकरणी पुण्यात १३ जणांवर गुन्हा दाखल

News Desk

महाराष्ट्रात कडक निर्बंध १ जूनपर्यंत वाढवले, काय आहेत नवे नियम?

News Desk