HW News Marathi
Covid-19

चिंताजनक! महाराष्ट्रातल्या कोरोना रुग्णांच्या सॅम्पलमध्ये डबल म्युटेशन आढळलं

मुंबई | राज्यात रोज ५० ते ६० हजारांच्यामध्ये कोरोना रुग्ण संख्या आढळत आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ही संख्या ६० हजारांच्या पुढे गेली आहे. महाराष्ट्रात फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढतेय. याला कारण कोरोनाचा बदललेल्या स्ट्रेन आहे का याचं उत्तर अद्याप सापडलेलं नाही. मात्र, नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीने केलेल्या एका सादरीकरणानुसार महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांच्या सॅम्पलमध्ये डबल म्युटेशन आढळलं आहे. याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

राज्यातील ६० टक्के सॅम्पल्समध्ये डबल म्युटेशन आढळल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. नॅशनल कोव्हिड टास्कच्या फोर्सच्या एका मिटिंगमध्ये नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीने (एनआयव्ही) एक प्रेझेंटेशन केलं होतं. पण याबाबत नॅशनल सेंटर फॉर डिसिज कंट्रोल (एनसीडीसी) ने याबाबत एनआयव्हीला याबाबत औपचारीकपणे माहिती दिली नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

२३ दिवसांत शेतकऱ्यांना मदत जाहीर करू | मुख्यमंत्री

News Desk

कोरोना उपचारासाठी रुग्णालयाच्या मनमानी बिलांना चाप लावण्यासाठी सरकारचा ‘हा’ निर्णय

News Desk

फडणवीस साहेब, थोडे शांत बसा आणि सरकारचे काम बघत रहा !

News Desk