HW News Marathi
महाराष्ट्र

नंदुरबारमधील वाहनचालक पेट्रोल भरण्यासाठी जातात गुजरातमध्ये

नंदुरबार | महाराष्ट्रात पेट्रोल दरवाढीचा भडका उडाला आहे. गेल्या १० दिवसांपासून दरदिवशी पेट्रोल दरवाढ होत असल्याचे चित्र असताना नंदुरबारमधील वाहनचालक पेट्रोल भरण्यासाठी गुजरातमध्ये जात असल्याचे पहायला मिळत आहे. कारण, महाराष्ट्राच्या तुलनेत गुजरातमध्ये पेट्रोल ९ ते १० रुपयांनी स्वस्त आहे. सध्या नंदुरबार जिल्हातील सीमावर्ती भागातील वाहनचालक गुजरातच्या पेट्रोल पंपावर गर्दी करत असल्याचे वृत्त आहे.

महाराष्ट्रासह प्रत्येक राज्याची कर रचना वेगळी असल्याची प्रचिती नंदुरबारकरांनी सध्या अनुभवायला मिळत आहे. अवघ्या ६ किलोमीटरवर असलेल्या गुजरातमध्ये पेट्रोल स्वस्त असल्यामुळे लोकांची गर्दी होत आहे. सध्या नंदुरबारमध्ये पेट्रोलचा दर ८७ रुपये ४० पैसे आहे. तर गुजरातमधील पेट्रोलचा भाव ७७ रुपये ९० पैसे आहे. महाराष्ट्रात सध्या एकूण ९ रुपये कर आकारणी पेट्रोलवर सुरू आहे. तर सर्वात महाग पेट्रोल अमरावतीत असून पेट्रोलचा आजचा दर ८६.५२ रुपये तर डिझेल ७४.११ रुपये आहे.

महाराष्ट्रात पेट्रोल का महागले ?

  • दुष्काळी कर ३ रुपये
  • महामार्गावरील दारूबंदीनंतर घटलेले उत्पादन ३ रुपये
  • शिक्षण कर १ रुपया
  • स्वच्छ भारत अभियान १ रुपया
  • कृषी कल्याण अभियान १ रुपया
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उच्च शिक्षण विभागाचे संचालक धनराज माने निलंबित

News Desk

एनडीए’चा शेवटचा ‘खांब’ही कलथून गेला !

News Desk

मराठा आरक्षण: न सांगता इतकी गर्दी जमली, सांगून बघू का? संभाजीराजेंचा ठाकरे सरकारला इशारा

News Desk