HW Marathi
Covid-19 महाराष्ट्र

स्वयंशिस्तीचे पालन केल्यामुळे राज्यातील ‘या’ गावात कोरोनाचा एकही रुग्ण नाही

अहमदनगर | राज्यात कोरोना रुग्णांची संख्या ही वेगाने वाढत आहे. राज्यातील अहमदनगर जिल्ह्यातील हिवरेबाजार ग्राम गावात कोरोनासारख्या महामारीत सुरक्षित आहे. या गावात कोरोनाचा एकही रुग्ण अद्याप आढळून आलेला नाही. या गावात मुंबई, पुणे आणि ठाणेहून लोक गावी परतले असूनही कोरोनाने या गावात शिरकाव केला नाही. हे सर्व आदर्शग्राम समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शनामुळे शक्य झाले आहे.

राज्यातील मुंबई, पुणे आणि ठाणे याशहरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. यामुळे येथील स्थानिक त्यांच्या गावी जात आहेत. मात्र, काही गावांनी या शहरातील लोकांना गावामध्ये परत घेण्यास मनाई करण्यात आली तर काही ठिकाणी त्यांना गावाबाहेर संस्थात्मक क्वारंटाईन केले आहेत. मात्र, हिवरेबाजारमध्ये स्वयंशिस्त असलेल्या  व्यक्तीस एक तर होम क्वारंटाइन अथवा संस्थात्मक क्वारंटाइन होत सर्व नियम पाळले जात आहेत.

तसेच गावकरीही शासनाच्या नियमाचे योग्य  पद्धतीनने पालन करत आहे. गावकरी घराबाहेर पडल्यानंतर शारीरिक अंतर पाळत नित्यनियमांचे पालन करताना दिसत असून तसेच गावातील जिल्हा परिषदेचा आरोग्य विभागाने गावातील शंभर टक्के नागरिकांची नियमित तपासणी सुरू ठेवत सर्वांच्या आरोग्यावर नजर ठेवली आहे. यामुळे आज हिवरेबाजार ग्राम हे कोरोनाच्या संकटापासून सुरक्षित आहेत

 

 

Related posts

हेच काय तुमचे हिंदुत्व?, सामनातून भाजपवर टीका

News Desk

#Coronavirus : कोवीडसंदर्भात डॉक्टरांचा सल्ला घ्या ! 

News Desk

रिसोड येथे आमदार निलंबनाच्या निषेधार्थ मोर्चा

News Desk