HW News Marathi
महाराष्ट्र

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर दरड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत

मुंबई । पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर खंडाळा घाटातील आडोशी बोगद्याजवळ रविवारी (७ जुलै) पहाटे दरड कोसळल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. लोणावळा व खंडाळा घाट परिसरात शनिवारपासून (६ जुलै) जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे काल (६ जुलै) रात्री पावसासोबत वारा देखील असल्याने खंडाळा घाटातील आडोशी बोगद्याजवळ डोंगराचा काही भाग सरकून द्रुतगती मार्गावर आला आहे. दगड व माती रस्त्यावर आल्याने मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक मंदावली आहे.

घटनेची माहिती समजताच खोपोली बोरघाट पोलीस व आयआरबीची मदत यंत्रणा, अपघातग्रस्तांच्या मदतीला या सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते घटनास्थळावर दाखल झाले असून मार्गावरील दरड बाजूला करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. सकाळी पावणेसात वाजता दरड बाजूला करत याठिकाणी थांबविलेली वाहतूक पुन्हा हळूहळू सुरू आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आता जीवनावश्यक वस्तूंची दुकाने २४ तास उघडी राहणार, मुख्यमंत्र्यांचा निर्णय

News Desk

भारतरत्न लता मंगेशकर यांनी दिली मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ७ लाखांची मदत

News Desk

किटकांचे नियंत्रण करण्यासाठी स्वतंत्र प्रोटोकॉल तयार करण्याचा निर्णय! – राधाकृष्ण विखे पाटील

Aprna