HW News Marathi
महाराष्ट्र

काँग्रेसचे माजी मंत्री सतीश चतुर्वेदींचे सुपुत्र दुष्यंत चतुर्वेदी यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

मुंबई | विदर्भातील काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांचे सुपुत्र दुष्यंत चतुर्वेदी यांनी आज (२३ जून) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. दुष्यंत यांनी ‘मातोश्री’ येथे शिवसेनेत जाहीर प्रवेश केल्यानंतर उद्धव ठाकरे त्यांचे शिवबंधन बांधून शिवसेनेत स्वागत केले.

दुष्यंत चतुर्वेदी हे नागपूर विद्यापीठातून वाणिज्य शाखेचे पदवीधर आहेत. नागपूरमधील लोकमान्य टिळक जनकल्याण शिक्षणसंस्थेचे विश्वस्त म्हणून ते काम करतात. या शिक्षणसंस्थेच्या मुंबई आणि नागपूरमध्ये २८ हून अधिक शैक्षणिक संस्था आहेत. चतुर्वेदी यांच्या पक्षप्रवेशामुळे विदर्भात आणि प्रामुख्याने नागपूर आणि आजूबाजूच्या परिसरात शिवसेना मजबूत होण्यास मदत होईल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“हम करे सो कायदा”, अशीच फडणवीसांची प्रवृत्ती, खडसेंचा पुन्हा एकदा हल्लाबोल

News Desk

“बाबासाहेबांच्या निधनाने महाराष्ट्राने साहित्य, कला क्षेत्रातील अध्वर्यू गमावला!” – शरद पवार

News Desk

दुष्काळग्रस्तांना दिलासा, योजनांची अंमलबजावणी करण्यास निवडणूक आयोगाची परवानगी

News Desk