HW News Marathi
देश / विदेश

दसऱ्याच्या नेत्यांकडून देशवासीयांना शुभेच्छा!

नवी दिल्ली | देशात आणि राज्यात सुरू असलेल्या कोरोना विषाणूच्या फैलावामुळे सध्या दैनंदिन व्यवहारांवर अनेक निर्बंध लागू करण्यात आलेले आहे. याचा फटका राजकीय आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनाही बसत आहे. इतिहासात प्रथमच यंदाचा दसरा महोत्सव गर्दी आणि सर्व सांस्कृतिक कार्यक्रम टाळून पार पडत आहेत. त्यामुळे, दसऱ्याच्या सणालाही दरवर्षीप्रमाणे उत्हास दिसून येत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशावायींना दसरा आणि महानवमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

देशात अनलॉक प्रक्रिया सुरू करण्यात आली असली, तर कोरोनाचे सावट अद्यापही आहेच. त्यामुळे, कोरोनावरील लस निघेपर्यंत सोशल डिस्टन्स, मास्क आणि सॅनिटायझर्स या त्रिसुत्रीचा अवलंब सर्वांना करावा लागणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर देशात महानवमी म्हणजे खंडेनवमी आणि विजयादशमी दसरा साजरा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन देशवासीयांना महानवमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. नवरात्रीच्या या पावन दिवशी माता सिद्धिदात्रीची पूजा-आरती करण्यात येते. माता सिद्धीदात्रीच्या आशीर्वादाने प्रत्येकाला आपल्या कार्यात सिद्धी प्राप्त होईल, अशा शुभेच्छा मोदींनी दिल्या आहेत.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही देशावासीयांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दसऱ्याचा हे पर्व अधर्मावर धर्माचा आणि असत्यावर सत्याच्या विजयाचे प्रतिक आहे. आनंद आणि उत्साहाचा हा उत्सव, महामारीच्या प्रभावापासून सर्वांच रक्षण करुन देशावासीयांना समृद्धी आणि आनंदी करेल, असे ट्विट कोविंद यांनी केले आहे.

तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही सगळ्यांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. विजायदशमीला शस्त्रांची पूजा होते. कोरोना महामारीच्या काळात मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग हीच कोरोनाशी लढण्यासाठी आपली महत्त्वाची अस्त्रे आहेत. त्यांच्या वापर करूया आणि कोरोनारूपी शत्रूवर विजय मिळवूया, असे ट्विट त्यांनी केले आहे.

तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही दसऱ्याच्या निमित्तानं आपणा सर्वांच्या घरात धनधान्याची आणि मनात चांगल्या विचारांची समृद्धी यावी, अशा शुभेच्छा! दुष्प्रवृत्तींवर सत्प्रवृत्तीच्या विजयाचा हा उत्सव सर्वांनी आनंदानं, उत्साहानं, सोशल डिस्टन्सिंग व कोरोनाप्रतिबंधक नियमांचं पालन करून साजरा करूया, असे ट्विट करत शुभेच्छा दिल्या आहेत.

कोरोना संकटावर मात करुन महाराष्ट्र नव्या जोमाने भरभराट आणि समृद्धीकडे वाटचाल करेल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला आहे.उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला दसऱ्याच्या पुर्वसंध्येला शुभेच्छा दिल्या आहेत. नियम पाळून, योग्य काळजी घेऊन एकजुटीने कोरोनारुपी रावणाचा नाश करुया, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं.लढवय्या महाराष्ट्र, अशी आपली ओळख आहे. आपण अनेकदा संकटांचा यशस्वी मुकाबला केला आहे. त्यामुळे कोरोना विषाणुच्या विरोधातील लढ्यातही आपण सर्व भेद बाजुला ठेवून एकवटले आहोत, असं मुख्यमंत्री म्हणाले. कोरोनाच्या विषाणूला पराजीत करण्यासाठी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहीम राबवत आहोत. घराघरापर्यंत पोहचून विषाणुचाच पाठलाग करुन, त्याला रोखण्याचा आपले कोरोना योद्धा प्रयत्न करत आहेत, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होतं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“भाजप हारला कोरोना जिंकला”, राऊतांचा भाजपला सणसणीत टोला

News Desk

फास्टॅगच्या नियमावलीत केंद्र सरकारकडून बदल

News Desk

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रवेशासाठी आरक्षणाला स्थगिती

News Desk