HW News Marathi
महाराष्ट्र

कोरोनावर नियंत्रणासाठी अर्ली डिटेक्शन आणि अर्ली ट्रिटमेंटवर भर द्या, चंद्रकांत पाटलांचा सल्ला

पुणे | कोरोनावर नियंत्रणासाठी अर्ली डिटेक्शन म्हणजे रुग्णांचा शोध आणि अर्ली ट्रिटमेंट म्हणजे तातडीने उपचार यावर भर दिला पाहिजे, अशी सूचना भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी केली. पुणे शहर भाजपाने कोरोनाविषयक उपाययोजनांची सर्वंकष माहिती देणाऱ्या डॅशबोर्डच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते.

ते म्हणाले की, सध्या सगळीकडे रेमडिसीवीर आणि ऑक्सिजनचा तुटवडा असून हा विषय सद्यघडीला आपल्या हातात नाही आहे. पण त्याबरोबरच अर्ली डिटेक्शन आणि अर्ली ट्रिटमेंटवर भर देण्याची गरज आहे. त्यासाठीच आगामी काही दिवसांत एक फिरती लॅब आपण शहरात उपलब्ध करून देणार आहोत. ज्याद्वारे शहराच्या प्रत्येक भागात जाऊन ही लॅब कोरोना चाचण्या घेऊन, त्यांचे रिपोर्ट तात्काळ उपलब्ध करून देणार आहे. ज्यालाच अर्ली डिटेक्शन म्हणता येईल. यामुळे रुग्णांचा किंवा कोरोनाबाधितांचा शोध लवकर लागेल. तसेच त्याला उपचार ही लवकर मिळतील.

पुणे शहर भाजपाच्या कोविड संदर्भातील उपक्रमावर बोलताना ते म्हणाले की, सद्यघडीला प्रत्येकालाच मानसिक आधाराची गरज आहे. त्यावर सकारात्मक बातम्यांची आणि माहितीची आज सर्वांना गरज आहे. त्यासाठी पुणे शहर भाजपाने तयार केलेल्या डॅशबोर्डमुळे पुणे शहरातील कोरोनाची सद्यस्थिती, लसीकरण केंद्रे, ऑक्सिजन बेड आणि रेमडिसीवीरची उपलब्धता आदी माहिती समाविष्ट आहे. याचा पुणेकरांना आपल्या खबरदारीसाठी नक्कीच लाभ होईल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बॉलिवूड अभिनेता आमिर खान आणि किरण रावचा घटस्फोट, १५ वर्षांचं नातं संपुष्टात

News Desk

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चिपळूणकडे रवाना, नुकसानीची करणार पाहणी

News Desk

राज्य सरकारची ई- पास बाबत आज महत्वाची बैठक

News Desk