HW News Marathi
देश / विदेश

अजित पवारांच्या निकटवर्तीयावर ED कारवाई, साखर कारखान्यावर जप्ती

मुंबई । राज्यातील बहुचर्चित महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळा प्रकरणात आता EDने पहिलीच मोठी कारवाई केली आहे. राज्य सहकारी बँकेत 25 हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणी आता ED केलेल्या या पहिल्या कारवाईमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार अडचणीत येणार असल्याची चर्चा आता दबक्या आवाजात सुरू झाली आहे. ह्याचे कारण असे की, ED ने अजित पवार यांचे मामा राजेंद्र कुमार घाडगे यांच्या जरंडेश्वर कारखान्यावर जप्तीची कारवाई केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जरंडेश्वरचा हा साखर कारखाना हा पूर्वी सहकारी साखर कारखाना होता. या कारखान्यावर महाराष्ट्र जिल्हा सहकारी बँकेचे कर्ज होते. ते कर्ज फेडू न शकल्याने या कारखान्याचा लिलाव करण्यात आला. त्यानंतर हा कारखाना ज्यांनी वैयक्तिकरित्या विकत घेतला ते अजित पवारांचे मामा राजेंद्र कुमार घाडगे आहेत. त्यामुळे आता ED ने याबाबत कारवाई करण्याचे मुख्य कारण म्हणजेच ‘अजित पवारांचे निकटवर्तीय हा कारखाना चालवत आहेत’ हेच आहे.

जरंडेश्वरचा हा कारखाना साताऱ्यातील एक अत्यंत महत्त्वाचा साखर कारखाना मानला जातो. ह्यावरून अनेकदा राजकारण पेटल्याचेही सांगण्यात येते. एक भावनिक नाते या कारखान्याशी असल्याचे सांगितले जाते. दरम्यान, या महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळ्यात अनेक साखर कारखान्यांच्या मालकांनी कर्ज घेऊन ते नंतर बुडवल्याचे म्हटले जाते. तसेच त्यानंतर या साखर कारखान्याची कमी भावात विक्री झाली आहे. याबाबत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली होती. त्यानुसार मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याच्या अनुषंगाने ईडीने आपला गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार आज ही कारवाई करण्यात आली आहे.

अजित पवारांसह ६५ जणांना क्लिनचिट

मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने सहकारी बँकेतील या घोटाळ्याबाबत अजित पवार ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह ६५ संचालकांना फेब्रुवारी २०२१ मध्ये क्लिनचिट दिली होती. मुंबईच्या सेशन्स कोर्टात मागील वर्षी क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला होता. मात्र या निकालाला माजी मंत्र्यांसह ५ जणांनी आव्हान दिले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“कोरोना वायरस म्हणून अपमान केलेल्या भाजपाला विधानसभा निवडणुकीत धडा शिकवा!”

News Desk

मानव तस्करी प्रकरणी गायक दलेर मेहंदीला २ वर्षाची शिक्षा

News Desk

भाजपला पहिल्यांदाच काश्मीर खोऱ्यातील तीन जागा मिळवण्यात यश

News Desk