HW News Marathi
महाराष्ट्र

अनिल परबांची ईडी कडून चौकशी करण्याची सोमय्यांची मागणी पूर्ण करायला तयार- अब्दुल सत्तार

जालना | ईडीकडून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मनी लॉनड्रिंग प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी शिवसेना नेते अनिल परब यांचीही चौकशी करण्यात यावी अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे. सोमय्या यांची मागणी राजकीय हेतुने असली तरी या प्रकरणात कोणत्याही मंत्र्यांचा हात नसून सोमय्या यांची असलेली परब यांच्या चौकशीची मागणी आम्ही पूर्ण करायला तयार असल्याचं महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे. ते जालन्यात पत्रकारांशी बोलत होते.

केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या चौकशी एजन्सीकडून पारदर्शक चौकशी व्हावी,कोणत्याही नेत्याला बळीचा बकरा बनवू नये,असं सांगत अनिल देशमुखांच्या घरापासून ऑफिसपर्यंत टाकण्यात आलेल्या धाडीत काहीही आक्षेपार्ह आढळून आलेलं नाही असंही सत्तार म्हणाले.

लॉकडाऊन वाढवण्याचा आणि मराठा समाजाला आरक्षण नाकारल्यामुळे त्यांच्या रोषाचा काहीही संबंध नसून राज्य सरकार मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत येणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा केल्या जाईल असं सांगत घटनादुरुस्ती साठी राज्य सरकार केंद्राकडे प्रस्ताव पाठवायला तयार असल्याचं ते म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पूर्व विदर्भाच्या दौऱ्यावर

News Desk

पहिल्या पावसात पैनगंगेला दुथंडी

swarit

आजपासून भाऊचा धक्का ते मांडवा जेट्टी ‘रो रो सेवा’ सुरू

swarit