मुंबई | ईडीने खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना पुन्हा नव्याने समन्स बजावले आहे. त्यानुसार, ५ जानेवारीला वर्षा राऊत यांना ईडीच्या कार्यालयात हजेरी लावावी लागणार आहे. पीएमसी बँक घोटाळाप्रकरणी त्यांची चौकशी करण्यात येणार आहे.
वर्षा राऊत यांना ईडीने यापूर्वी समन्स बजावले होते आणि २९ डिसेंबर रोजी अर्थात आजच चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. मात्र, राऊत यांनी ईडीकडे थोडा वेळ मागितला होता. त्यांची ही विनंती स्विकारत ईडीने पुन्हा नव्याने समन्स पाठवत ५ जानेवारी पूर्वी ईडीसमोर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
Enforcement Directorate issues fresh summon to Varsha Raut wife of Shiv Sena MP Sanjay Raut to appear before it on 5th January in connection with PMC Bank scam case: ED official
She had sought time from the agency till January 5 when she was summoned earlier.
— ANI (@ANI) December 29, 2020
सूत्रांच्या माहितीनुसार, संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना काही दिवसांपूर्वी ईडीने अटक केली होती. वर्षा राऊत आणि प्रवीण राऊत यांच्या खात्यात काही व्यवहार झाले. त्याबाबतचा तपशील जाणून घेण्यासाठी ईडीने वर्षा राऊत यांना नोटीस पाठवली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.