HW News Marathi
महाराष्ट्र

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ गायकवाड यांचं निधन

मुंबई | कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ गायकवाड यांचं निधन झालं आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचे वडील एकनाथ गायकवाड यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. मुंबईच्या ब्रीच कॅंडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. या उपचारादरम्यान त्यांचं निधन झाले आहे.

एकनाथ गायकवाड हे मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष होते. तसेच त्यांनी राज्य मंत्रिमंडळात त्यांनी मंत्रिपद भूषविलं होतं. काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते म्हणून त्यांची ओळख होती. सगळ्यात मोठ्या झोपडपट्टी भागावर म्हणजेच धारावीवर त्यांची पकड होती. इतकंच नाही तर एकनाथ गायकवाड यांना दलित चळवळीतील कार्यकर्तेही मानत होते. सर्वच रिपब्लिकन नेत्यांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते.

एकनाथ गायकवाड यांनी दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातून शिवसेना नेते आणि लोकसभेचे माजी सभापती मनोहर जोशी यांचा पराभव केला होता. जोशींचा पराभव करून ते जायंट किलर ठरले होते. त्यानंतर दोनवेळा ते दक्षिण मध्य मुंबईतून विजयी झाले होते. मात्र, नंतर शिवसेनेचे नेते राहूल शेवाळे यांनी गायकवाड यांचा पराभव केला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उद्धव ठाकरे राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी अयोध्येला निश्चितच जातील !

News Desk

कुशल व्यंगचित्रकार व शब्दांवर प्रभुत्व असलेले उत्कृष्ठ वक्ते बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन, शरद पवारांनी केले ट्विट  

News Desk

मातोश्रीमध्ये भुताटकी तिथे शांतीतज्ञ करा, नारायण राणेंचा खोचक सल्ला

News Desk