मुंबई। राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एकनाथ खडसेंवर क्रिटीकल शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या वकिलांनी दिली आहे. एकनाथ खडसेंना पुण्यातील भोसरी भूखंड प्रकरणात ईडीकडून समन्स धाडण्यात आले आहे. तसेच मुंबई सेशन कोर्टात एकनाथ खडसे अनुपस्थित राहिले आहेत. यावेळी खडसेंच्या वकिलांनी कोर्टात माहिती दिली आहे. खडसेंना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याच्या माहितीवरुन सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी टीका केली आहे. एकनाथ खडसे खोटं बोलून गैरहजर राहिल्याचा आरोप दमानिया यांनी केला आहे.
खडसे मुंबई सेशन कोर्टात अनुपस्थित
राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे यांच्यावर भोसरी भूखंड प्रकरणात ईडी चौकशी सुरु आहे. या घोटाळ्याप्रकरणी खडसे मुंबई सेशन कोर्टात अनुपस्थित राहिले आहेत. वकिलांनी खडसे आजारी असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे कारण सांगितले आहे. खडसेंवर क्रिटीकल शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती वकिलांनी दिली आहे. खडेंना ईडीने समन्स जारी करत चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. परंतु खडसे गैरहजर राहिले असून वकिलांनी याबाबत ईडीला पत्र दिले आहे.
खडसे खोट्यावर खोटं बोलत
एकनाथ खडसे कोर्टात गैरहजर राहण्यासाठी खोटं बोलत आहेत. खडसे खोट्यावर खोटं बोलत असल्याचे आश्चर्यकारक आहे. सेशन कोर्टात गैरहजेरीबाबत खडसेंच्या वकिलांनी सांगितले की, खडसेंवर क्रिटीकल शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्यामुळे त्यांना बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. परंतु ते खोटं बोलत असल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे.
SHOCKING
Lies after Lies
Eknath Khadse's lawyer has made a statement before the Hon'ble Sessions court that Shri Khadse is PERMANENTLY DISABLED???
Also that he has been admitted in an ICU and to undergo a LIFE SAVING SURGERY?
Lies only to avoid physical appearance at court?
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) October 6, 2021
नेमकं प्रकरण काय?
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील भोसरी भूखंड एकनाथ खडसे यांनी खरेदी केला होता. एकनाथ खडसे महसूल मंत्री असताना भोसरी भूखंड हा पत्नी मंदाकिनी खडसे आणि त्यांचे जावई गिरीश चौधरी यांनी ३ कोटी ७५ लाख रुपयांना खरेदी केली होती. सर्वे क्रमांक ५२ मधील ३ एकर जागा त्यांनी खरेदी केली. जमिनीची स्टॅम्प ड्युटी म्हणून १ कोटी ३७ लाख रुपयेही भरण्यात आले. सदर जमीन एमआयडीसीच्या मालकीची आहे. व ती ९९ वर्षांच्या कराराव खरेदी करण्यात आली असल्याचे एमआयडीसीकडून सांगण्यात आले आहे. एकनाथ खडसे यांनी आपल्या पदाचा गैरवापर करुन जमीन खरेदी केली असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला यामुळे त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.