HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

विधीमंडळात खडसेंनी दिला भाजपला घरचा आहेर

मुंबई | गेल्या पाच वर्षात राज्यात सर्वात जास्त कुपोषणाने बालकांचा मृत्यू झाला आहे. यानंतर सरकारला कधी जाग येणार, असा सवाल भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आज (१८ जून) विभासभेत उपस्थित करून सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. खडसे हे भाजपचे नेते असल्याने सभागृहात सर्वांच्या नजरा त्यांच्यावर होत्या. खडसेंनी सवाल उपस्थित केल्याने भाजपला घरचा आहेर दिला.

विधीमंडळाच्या प्रश्नोत्तराच्या तासात आदिवासी विभागाच्या अनुदानित आश्रमशाळेच्या शिक्षकांच्या विविध मागण्यांचा संदर्भात योगेश घोलप यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर सभागृहात विरोधीपक्षाचे सदस्य आक्रमक झाले होते. या प्रश्नांना नव्याने पदभार स्वीकारलेले आदिवासी विकास मंत्री अशोक उईके हे उत्तरे देत होते. नव्याने पदभार स्वीकारल्यानंतर उईके यांची  सभागृहात उत्तर देण्याची पहिलीच वेळ असल्याने सावध भूमिका घेण्याचा त्यांनी प्रयत्न करत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही सभागृहात उपस्थित नव्हते. त्यामुळे खडसे यांनी विरोधी सदस्यांच्या सुरात सूर मिसळत आपल्याच पक्षातील मंत्र्यांला धारेवर धरून सरकारच्या कामकाजावर टीका केली.

 

Related posts

छत्तीसगढमध्ये १ लाखाचे बक्षीस असलेल्या नक्षलवाद्याला कंठस्नान

News Desk

पंजाबच्या मुख्यमंत्र्यांची पाकला धमकी

News Desk

मराठा आरक्षण : श्रेय घेण्यासाठी शिवसेनेने काहीच केले नाही !

News Desk