मुंबई | गेले अनेक दिवस भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे पक्षावर नाराज आहेत. त्यांची नाराजी त्यांनी व्यक्त देखील केली आहे. अशात आता एखनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या. दरम्यान, आजत (७ ऑक्टोबर) भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेण्याची शक्यता आहे. पवारांना भेटण्यासाठी खडसे कालच मुंबईत दाखल झाल्याने ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी पुन्हा उधाण आले आहे.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी नुकतीच राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा केली. त्यात महाराष्ट्रातून पंकजा मुंडे, विनोद तावडे आदी नेत्यांचा समावेश करण्यात आला. मात्र, या कार्यकारिणीत खडसेंना स्थान देण्यात आले नाही. त्यामुळे खडसे गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थ होते. त्यामुळे खडसे राष्ट्रवादीत जाणार असल्याचा कयासही वर्तवण्यात येत होता. तसेच, गेल्या आठवड्यात शरद पवार आणि पक्षातील जळगावमधील नेत्यांसोबत एक बैठक केली होती. या बैठकीत खडसेंच्या प्रवेशावर चर्चा झाल्याचं बोललं जात होत. त्यानंतर आता खडसे मुंबईत आल्याने त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चेने जोर धरला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.