HW News Marathi
Covid-19

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण

मुंबई | राज्यात कोरोना रूग्णांची संख्या नियंत्रणात आली असताना मागील काही दिवसांपासून कोरोनानं पुन्हा डोकं वर काढलं आहे, दिवसभरात ३ हजारापेक्षा अधिक कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने सरकारची चिंता वाढली आहे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर असतानाच आणखी एका नेत्याला कोरोना झाल्याची माहिती समोर येत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण झाली आहे, ट्विटवरून याबाबत त्यांनी माहिती दिली आहे, खडसे म्हणाले की, ‘माझी कोरोना चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली असून माझी तब्येत चांगली आहे. काळजीचे कारण नाही, गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी’, अशी विनंती त्यांनी कार्यकर्त्यांना केली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्रात लॉकडाऊनशिवाय आता पर्याय उरला नाही,सर्वपक्षीय बैठकीत मुख्यमंत्र्यांचं स्पष्ट मत!

News Desk

कोरोनाच्या अग्निपरीक्षेतून बाहेर पडल्याशिवाय विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा कशा घ्यायच्या? | सामना

News Desk

राहूल गांधी यांना कोरोनाची लागण

News Desk