जळगाव | राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी आता भाजप आमदार गिरीश महाजन यांना थेट त्यांच्याच मतदारसंघात जाऊन इशारा दिला आहे. जामनेर या गिरीश महाजन यांच्या मतदारसंघात जाऊन एकनाथ खडसे यांनी भाजपला इशारा दिला आहे. “मी सीडी लावण्याबाबत खरंतर गंमतीने बोललो होतो. पण माझ्यामागे खरंच ED लावलीत. त्यामुळे, आता माझे सीडी लावण्याचे काम अजून बाकी आहे”, असे एकनाथ खडसे म्हटले आहेत. यावेळी एकनाथ खडसे जळगावमधील राष्ट्रवादी संवाद यात्रेला संबोधित करत होते.
एकनाथ खडसे यावेळी म्हणाले कि, “राष्ट्रवादीत प्रवेश करताना “माझ्यामागे ED लावली तर मी सीडी लावेन” असं मी गंमतीने म्हणालो होतो. जयंत पाटील यांनी मला विचारले होते कि, ‘तुमच्यामागे ईडी लागली तर ?’ तेव्हा मी म्हणालो होतो कि, ‘मग मी सीडी लावेन’. मी गंमतीने म्हणालो होतो पण ह्यांनी खरंच माझ्यामागे ED लावली. त्यामुळे आता अजून आपलं सीडी लावण्याचं काम बाकी आहे”, असा इशारा खडसेंनी दिला. त्यामुळे, “खडसे यांनी सीडी लावली तर कोणकोण अडचणीत सापडणार ?” असा सवाल सध्या राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहे.
दरम्यान जळगावातील राष्ट्रवादीच्या परिवार संवाद यात्रेदरम्यान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी एकनाथ खडसे यांचे कौतुक केले आहे. “नाथाभाऊंच्या कामामुळे खान्देशातील जनतेचा पक्षाला नक्कीच पाठिंबा मिळेल”, असा विश्वास जयंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.