HW News Marathi
महाराष्ट्र

स्वत:हून राजीनामा दिला नाही, वरिष्ठांच्या आदेशामुळे कोऱ्या कागदावर सही केली !

मुंबई । “मी स्वत:हून राजीनामा दिला नाही. वरिष्ठांकडून आदेश देण्यात आल्यानंतर मी राजीनामा दिला”, असा गौप्यस्फोट भाजपचे वरिष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. “माझ्यावर आरोप झाल्यानंतर भाजपचे राष्ट्रीय सहसंघटनमंत्री व्ही. सतिश माझ्याकडे आले. त्यांनी मला सांगितलं की वरिष्ठांचे आदेश आहेत, राजीनामा द्या. म्हणून मी कोऱ्या कागदावर सही केली. म्हणून मी राजीनामा दिला”, असे भाजपचे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. ‘एबीपी माझा’ या मराठी वृत्तवाहिनीशी खडसे बोलत होते.

एकनाथ खडसे हे गेल्या अनेक दिवसांपासून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर, खडसेंनी आता एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. “मला वरिष्ठांचे नाव सांगितल्यानंतर मी कोऱ्या कागदावर सही केली होती. मी स्वत:हून राजीनामा दिला नाही. मात्र पक्षाकडून मला असे सांगण्यात आले की, जेव्हा प्रेस कॉन्फरन्स घ्याल तेव्हा सांगा की तुम्ही स्वत:हून राजीनामा देत आहात. तसेच, स्वत:हून चौकशीची मागणी केली”, असाही दावा खडसेंनी केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘आदित्य संवाद’ नंतर आता शिवसेनेचा ‘माऊली संवाद’

News Desk

मराठी पाट्यांचं श्रेय फक्त महाराष्ट्र सैनिकांचंच! – राज ठाकरे

News Desk

विद्यापीठातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक राजमातांच्या कार्यकर्तृत्वाला साजेसे व गौरव वाढवणारे असले पाहिजे – अजित पवार

News Desk