HW News Marathi
महाराष्ट्र

एकनाथ शिंदेनी आदिवासी महिलांकडून राखी बांधून घेत केला सण साजरा!

डचिरोली | पालकमंत्री एकनाथ शिंदे हे जिल्हा नियोजन समितीचा आढावा घेण्यासाठी जिल्ह्यात दाखल झाले होते. आढावा सभा झाल्यावर त्यांनी अतिदुर्गम, आदिवासीबहुल नक्षल्यांच्या कारवायांचे केंद्र असलेल्या एटापल्ली तालुक्यातील हेडरी येथील पोलीस मदत केंद्राला भेट दिली. यावेळी त्यांनी नक्षली कारवायांचा धोका पत्करून कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस बांधव आणि भगिनींना ते करत असलेल्या कामाबद्दल त्यांचे आभार मानले. तसेच त्यांना कर्तव्य बजावताना येणाऱ्या सर्व समस्या सोडवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

पोलीस कुटूंबातील महिला आणि स्थानिक आदिवासी महिलांकडून राखी बांधून घेतली

जिल्ह्यातील नक्षली कारवायांचे केंद्र असलेल्या अतिसंवेदनशील एटापल्ली तालुक्यातील हेडरी येथील पोलीस आउटपोस्टला भेट देऊन पोलीस दलात कार्यरत असलेल्या महिला पोलीस, पोलीस कुटूंबातील महिला आणि स्थानिक आदिवासी महिलांकडून राखी बांधून घेत रक्षाबंधनाचा सण जिल्ह्याचे पालकमंत्री तथा नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी साजरा केला. याप्रसंगी उपस्थित सर्व महिला भगिनींना त्यांनी शुभेच्छा दिल्या.

यावेळी गडचिरोली जिल्ह्याचे पोलीस उप महानिरीक्षक संदीप पाटील, गडचिरोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, गडचिरोलीचे जिल्हाधिकारी दीपक सांगला आणि सर्व पोलीस बांधव त्यांचे कुटूंबीय आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.त्यांनी नक्षली कारवायांचा धोका पत्करून कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस बांधव आणि भगिनींना ते करत असलेल्या कामाबद्दल त्यांचे आभार मानले. तसेच त्यांना कर्तव्य बजावताना येणाऱ्या सर्व समस्या सोडवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्राचा सुपुत्र कौस्तुभ राणे काश्मीरमध्ये शहीद

swarit

मख्यमंत्री साम, दाम, दंड, भेद वापरून आमचे आमदार फोडण्याचा प्रयत्न करतायत !

News Desk

अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणारे नराधम अटकेत

News Desk