HW News Marathi
महाराष्ट्र

शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदे यांची निवड

मुंबई | शिवसेना विधीमंडळ पक्षाच्या नेतेपदी एकनाथ शिंदे यांची वर्णी लागली आहे. शिवसेना युवा नेता आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदेच्या नावाचा प्रस्ताव बैठकीत मांडला. एकनाथ शिंदे यांना एकामताने निवड करण्यात आली. तर सुनील प्रभू विधानसभेतील शिवसेनेचे पक्षप्रतोद पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

शिवसेना त्यांच्या नवनिर्वाचित आमदार आणि नेते बैठकीनंतर महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहेत. राज्यातील ओल्या दुष्काळासंदर्भात राज्यपालांची भेट घेणार असल्याची माहिती मिळाली आहे.एकनाथ शिंदे हे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री होते. २००४ पासून सलग ४ वेळा ते आमदार राहिले असून कोपर-पाचपाखडी या विधानसभा मतदारसंघांतून ते आमदार आहेत.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्याची कृती म्हणजे लोकशाहीचा खून! – नाना पटोले

Aprna

देशाच्या विकासासाठी जीएसटी आवश्यक – कुलगुरु डॉ. पंडित विद्यासागर

News Desk

मुंबईत ‘कोरोना’चा एकही रुग्ण, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नका !

swarit