HW News Marathi
महाराष्ट्र

एकनाथ खडसेंचा मुक्ताईनगरमध्ये धमाका, महाविकासआघाडी पुरस्कृत पॅनलचा विजय

जळगाव | ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर स्थानिक पातळीवर झालेल्या पहिल्याच निवडणुकीत भाजपचा पुरता धुव्वा उडाला आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील ४७ ग्रामपंचायतींपैकी ९ गावांमध्ये महाविकासआघाडी पुरस्कृत पॅनलचा विजय झाला आहे. तर इतर गावांमध्येही महाविकासआघाडी पुरस्कृत पॅनल्सची जोरदार आघाडी सुरु आहे.

एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला तरी भाजपला फारसा फरक पडणार नाही. भाजपकडे त्यांची उणीव भरुन काढणारे नेते असल्याचा दावा गिरीश महाजन आणि रावसाहेब दानवे यांनी केला होता. मात्र, आता मुक्ताईनगरमधील निकाल पाहता या संपूर्ण पट्ट्यात एकनाथ खडसे यांचेच वर्चस्व असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

कोथळी ग्रामपंचायतीच्या निकालांवरुन खडसे परिवारात युद्ध सुरु झाले आहे. याठिकाणी पाच जागांवर शिवसेना तर सहा जागांवर भाजपचे उमेदवार निवडून आले. मात्र, आता भाजप आणि राष्ट्रवादीकडून आपल्या विजयाचे दावे-प्रतिदावे केले जात आहेत. कोथळी हे एकनाथ खडसे यांचे गाव आहे.

तर दुसरीकडे गिरीश महाजन यांनी जामनेर तालुक्यातील आपले वर्चस्व राखले आहे. तालुक्यातील 90 टक्के ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा फडकली आहे. मात्र, काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसने मोठी मुसंडी मारली आहे. जसे निकाल हाती येत आहेत तसे राजकीय वर्तुळातील वातावरण बदलताना दिसत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सर्वसामान्य जनतेच्या अपेक्षा राज्य सरकार पूर्ण करणार! – मुख्यमंत्री

Aprna

पिंपरी चिंचवड गोळीबार प्रकरणी दोषींवर कारवाई होणारच! –  अजित पवार

News Desk

‘ओबीसींना आरक्षण न मिळण्यास भाजपच जबाबदार’, नाना पटोलेंचा थेट हल्ला

News Desk