चंद्रपूर | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय, अॅड. एकनाथराव साळवे यांचं आज वृद्धापकाळाने निधन झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. एकनाथराव साळवे यांनी आज चंद्रपुरात राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. अनेक राजकीय नेत्यांनी साळवे यांच्या निधनानंतर हळहळ व्यक्त केली आहे. एक समाजसेवक आपल्यातून गेला, अशी भावना अनेक नेते व्यक्त करीत आहेत. १९६७ ते १९७८ असे २ टर्म चंद्रपूर मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार म्हणून त्यांनी काम केलं आहे.
याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय होते. अनेक नक्षल संबंधित खटल्यात नक्षलवाद्यांचे आणि आदिवासींचे वकील म्हणूनही त्यांचं नाव घेतलं जातं. त्यांच्या पुढाकारामुळे अनेक अडचणी सोडविण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. १९९१ साली माजी आमदार धर्मरावबाबा आत्राम यांचे नक्षलवाद्यांनी अपहरण केल्यावर सरकार-नक्षली यांच्यात मध्यस्थी घडवून आत्राम यांची सोडवणूक करण्यात एकनाथराव साळवे यांचा मुख्य वाटा होता. याशिवाय कायदा-नक्षलवाद यावर त्यांनी विपुल लेखन केलं असून याविषयासंबंधित पुस्तकही आहेत. “एन्काऊंटर” या कादंबरीमुळे त्यांचे नाव विशेष गाजले होते.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.