HW News Marathi
Covid-19

मुख्यमंत्र्यांच्या ‘या’ निर्णयाबद्दल एकता कपूर यांनी मानले आभार

मुंबई | कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे चित्रपटसृष्टीतील संपूर्ण कामे ठप्प झाली होती, आता काही अटी-शर्तींच्या अधीन राहून चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी मालिकांच्या चित्रीकरणास शासनाने मान्यता दिली आहे, याबाबतचा शासन निर्णय काल (१ जून ) सांस्कृतिक कार्य विभागाने जारी केला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाचे बॉलिवूड दिग्दर्शक एकता कपूर यांनी स्वागत करत ट्वीटद्वारे त्यांचे आभार मानले आहे.

एकता कपूर म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी यांनी चित्रपट आणि टेलिव्हिजन शुटींगवरील निर्बंध कमी करून टप्प्याटप्प्याने काम सुरू करण्याच्या आमच्या विनंतीचा विचार केल्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. तसेच आदर्श बांदेकर आणि नितीन वैद्य या दोघांनी चित्रपट आणि टेलिव्हिजनमधील काम करणाऱ्या कामगारांना परत दिल्याबद्दल आणि त्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल यांचे विशेष आभार मानते, असे ट्वीट त्यांनी केले आहे.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पत्रकार, वृत्त वाहिन्यांचे प्रतिनिधी यांना फ्रंट लाईन वर्कर घोषित करा, धनंजय मुंडेंचीही मागणी

News Desk

डोनाल्ड ट्रम्प यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ‘कोरोना पॉझिटिव्ह’ 

News Desk

मजुरांना रोजगार निर्माण होणार, ‘गरीब कल्याण रोजगार योजने’चे पंतप्रधानांच्या हस्ते उदघाटन

News Desk