HW Marathi
महाराष्ट्र मुंबई राजकारण

मनसेच्या नव्या झेंड्याला निवडणूक आयोगाची नोटीस

mns protest 9 feb

मुंबई | छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा असलेला नवा झेंडा अनावरण झाल्यापासून वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. पक्षाच्या या अधिकृत महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे. मनसेच्या या भगव्या झेंड्याला अनेकांवी विरोध केला. संभाजी ब्रिगेडसह राज्यातील इतर संघटनांनी केलेल्या तक्रारीची दखल देत ही नोटीस बजावण्यात आली आहे.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले आणि राज्याच्या राजकारणाची परिस्थिती बदलली हीच स्थिती लक्षात घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी १४ वर्षांनी पक्षाचा झेंडा बदलण्याचा निर्णय घेतला. अलीकडेच मनसेच्या राजव्यापी अधिवेशनात आपली राजकीय भूमिका बदलल्याचेही पक्षाने या अधिवेशनातून स्पष्ट केले. बदललेल्या जावर शिवरायांची राजमुद्रा आहे. त्यास राज्यातील काही संघटनांनी आक्षेप घेतला होता. तसंच, निवडणूक आयोगाकडं तक्रारही केली होती. याच तक्रारीची दखल घेत निवडणूक आयोगाने मनसेला पत्र पाठवले. शिवाय संघटनांच्या तक्रारींवर योग्य ती कार्यवाही करा असेही आयोगाने मनसेला बजावले आहे.

Related posts

मुंबई विमानतळावर सोने तस्करीचे रॅकेट उघडकीस

News Desk

बाळासाहेबांच्या कलादालनावरून शिवसेना-भाजपमध्ये मोठी बाचाबाची

News Desk

देशभक्तीला पर्यायी शब्द म्हणजे ‘चौकीदर’ !

News Desk