HW News Marathi
महाराष्ट्र

सांगलीत निवडणूकीची रणधुमाळी होणार सुरू भाजपला सत्ता टिकवण्यासाठी करावी लागणार धावाधाव

सांगली | सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेची महापौर निवडणूक चुरशीच्या वळणावर पोचली आहे. येत्या २३ फेब्रुवारीला निवडणूक होणार असून भाजपकडे बहुमत असतानाही सत्ता टिकवण्यासाठी धावाधाव करावी लागत आहे. तर तिसऱ्या क्रमांकावरील राष्ट्रवादीने महापौरपद खेचण्यासाठी भाजपचे सहा सदस्य गळाला लावले आहेत.

या निवडणुकीत संघर्ष पहायला मिळत आहे. यात कोण वरचढ ठरणार हे लवकर स्पष्ट होणार आहे. सांगली, मिरज कुपवाड शहर महापालिकेत भाजपने अडीच वर्षापुर्वी पुर्ण बहुमताने सत्ता हस्तगत केली. ७८ पैकी ४१ जागा जिंकून भाजप स्वबळावर सत्तेत आले. अर्थात यामध्ये कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीतून आलेल्यांचा भरणा मोठा आहे. शिवाय दोन अपक्ष सदस्यांचाही त्यांना पाठिंबा मिळाल्याने त्यांचे संख्याबळ भक्कम झाले. २०१८ मध्ये राज्यात भाजपचे सरकार अस्तित्वात असताना महापालिका जिंकून भाजपने इतिहास घडवला होता.

भाजपचे १२ नाराज सदस्य फोडण्याचे काम सुरु असताना त्यातील तीन सदस्यांना पुन्हा आपल्याकडे खेचण्यात भाजप नेते यशस्वी ठरले. मात्र उर्वरित नऊ सदस्य अद्याप नॉटरिचेबल आहेत. त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न भाजप नेते करत आहेत. मात्र अजून तरी यश आल्याचे दिसत नाही. त्यामुळे भाजपमध्ये अस्वस्थता आहे. भाजपकडून महापौरपदासाठी धीरज सूर्यवंशी तर उपमहापौरपदासाठी गजानन मगदूम यांनी अर्ज दाखल केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भोकर महावितरण विभागाच्या कार्यकारी अभियंतापदी गोपुलवाड रुजू

News Desk

कुठल्याही प्रकारे बेडची कमतरता भासणार नाही – अजित पवार

News Desk

लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा; उद्या राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर

Aprna