HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यातील १० जिल्हे हत्तीरोग मुक्त; हत्तीरोगाचे २०२१ पर्यंत उच्चाटन करण्याचे आरोग्यमंत्र्यांचे आवाहन

मुंबई | हत्तीरोगाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी २ मार्च ते २० मार्च २०२० पर्यंत नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, नांदेड, या ६ जिल्ह्यांत विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेची व्यापकता लक्षात घेऊन कालमर्यादा वाढवण्यात आली आहे. जिल्‍हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समितीच्या माध्यमातून अंतरविभागीय समन्वय पर्यवेक्षण व जनजागृती वर भर द्यावा. सर्व पात्र व्यक्तींना हत्तीरोग गोळ्यांच्या सेवनाची खात्री करुन आपला जिल्हा २०१२१ पर्यंत हत्तीरोग दुरीकरणाचे उद्दिष्ट साध्य करेल यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावेत, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल ९२ मार्च) केले.

राज्यस्तरीय हत्तीरोग दुरीकरण कार्यक्रम सार्वत्रिक औषधोपचार मोहिम २०२० चे काल आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते डिजिटल उद्घाटन मंत्रालयासमोरील नवीन प्रशासन भवन येथे व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून करण्यात आले. हत्तीरोग यावर आधारीत चित्रफित सुरवातीला दाखवण्यात आली. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सहा जिल्ह्यातील हत्तीरोग दुरीकरण कार्यक्रम कशा प्रकारे राबविण्यात येतो त्यांच्या अंमलबजावणी व पूर्वतयारीविषयी माहिती जाणून घेतली.

गुणवत्ता वाढवण्यासाठी गृहभेटी शिवाय शाळा, कॉलेज कार्यालय, कारखाने व गरजेनुसार बुथ मार्फत नागरिकांनी गोळ्या सेवन कराव्यात यासाठी सेवनावर सुक्ष्मकृती नियोजनमाप्रमाणे कार्यवाही व्हावी. सध्या राज्यातील नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, नांदेड, गोंदिया, ठाणे व पालघर या आठ जिल्ह्यामध्ये ही मोहीम राबविण्यात येत असल्याची माहिती टोपे यांनी यावेळी दिली. या मोहिमेअंतर्गत लाभार्थ्यांनी १०० टक्के गोळ्या सेवन केल्या जातील याची खात्री करावी. किरकोळ दुष्परीणाम आढळल्यास त्याचे त्वरीत उपचार करण्यासाठी त्या रुग्णांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात यावे. या वर्षी नागपूरसह, चंद्रपूर व भंडारा या ४ जिल्ह्यांमध्ये आयव्हरमेक्टीन, डीईसी व अल्बेंडॅझोल या ट्रिपल ड्रग थेरपीनुसार मोहिम राबविण्यात येणार आहे.

नांदेड, गोंदिया या दोन जिल्ह्यांमध्ये डिईसी व अल्बेंडॅझोल हत्तीरोग विरोधी गोळ्याचा वापर करण्यात येणार आहे. यामध्ये दोन वर्षाखालील बालके, गरोदर माता व गंभीर आजारी व्यक्ती वगळून सर्व व्यक्तीना मोहिमेअंतर्गत गोळ्या खाऊ घालण्यात येणार आहे. मागील वर्षांपर्यंत या मोहिमेमध्ये डीईसी व अल्बेंडॅझोल या दोन गोळ्यांचा समावेश होता. जागतिक आरोग्य संघटनेच्या सहकार्याने आयव्हरमेक्टीन या अत्यंत प्रभावी औषधाचा अंर्तभाव प्रायोगीक तत्वावर नागपूर जिल्ह्यात केला. या तिन गोळ्यांचे सेवन सलग दोन वर्षे सर्व पात्र लाभार्थ्यांने केले तर हे जिल्हेही हत्तीरोगमुक्त होऊ शकतात. असे शास्त्रीय अभ्यासातून सिद्ध झाले आहे. राज्यात एकूण १८ जिल्हे हत्तीरोग प्रवण होते. त्यापैकी १० जिल्हे हत्तीरोगमुक्त करण्यात आले आहेत. त्याबद्दल आरोग्यमंत्री यांनी सर्व अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.

मुख्यकार्यकारी अधिकारी व जिल्हाधिकारी यांनी आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्याशी समन्वय साधून ग्राऊंड स्तरावर काम करण्याची जबाबदारी घ्यावी. सर्वांना योग्य औषधे दिली जातात की नाही यांची खातरजमा करावी. यामध्ये काही अडचणी निर्माण झाल्यास तातडीने संबंधित अधिकाऱ्यांना कळवावे. हे काम आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी समन्वयाने पूर्ण करतील, असा विश्वास टोपे यांनी व्यक्त केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पवारसाहेब आता तुमच्या कोर्टात चेंडू आहे, तुम्हीच शेतकऱ्यांचा विषय सोडवावा- पंकजा मुंडे

News Desk

सीमा भागातील मराठी बांधवांच्या पाठीशी राज्य शासन भक्कमपणे उभे! – चंद्रकांत पाटील

Aprna

राज्यातील पोलीस बंदोबस्तात वाढ, राज्य राखीव दलातील 7 तुकड्या तर 30 हजार होमगार्ड तैनात

Aprna