मुंबई | राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेनेचे नेते अनिल परब यांच्या वांद्रे येथील खासगी निवासस्थानी ईडीने छापा मारला आहे. अनिल परब यांना ईडीने मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला असून या प्रकरणी अनिल परब यांच्या घरी आज (२५ मे) सकाळी ईडीच्या पथाने छापा टाकला. ईडीने अनिल परब यांच्या वांद्रे येथील खासगी आणि मरिन ड्राईव्ह शासकीय निवासस्थानी ‘अजिंक्यतारा’ येथे छापे मारले आहे. तसेच मुंबई, पुणे आणि रत्नागिरी येथील सात ठिकाणी ईडी छापे टाकल्याची माहिती एएनआयने दिली आहे. ईडीच्या या कारवाईने शिवसेनेला मोठा धक्का बसला असल्याचे बोलले जाते.
अनिल परबांनी दापोली येथे बांधलेले २५ कोटी रुपयाचे रिसोर्ट बांधले आहे. ईडीने अनिल परबांच्या दापोली रिसोर्ट प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्याची माहिती मिळाली आहे. असून या रिसोर्ट बांधकामात कोणी खर्च केला? , सचिन वाझेकडून १०० कोटी वसुली येत होती का?, असे सवाल भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईनंतर माध्यमांशी बोलताना केले आहे.
Enforcement Directorate conducts raids at seven locations in Pune and Mumbai of Maharashtra minister and Shiv Sena leader Anil Parab
— ANI (@ANI) May 26, 2022
याआधी राज्याचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांच्यावर कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्या नातेवाईकांशी आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी ईडीने अटक केले आहे. गेल्या दोन महिन्यापासून नवाब मलिक हे तुरुंगात आहेत. यापूर्वी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणी अटक केली आहे. देशमुखांना ईडीने २९ डिसेंबर २०२१ रोजी १०० कोटींच्या वसुली आणि मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली होती.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.