HW News Marathi
देश / विदेश

दीपक तलवार प्रकरण : ईडीकडून प्रफुल्ल पटेल यांना समन्स बजावला

मुंबई | दीपक तलवार प्रकरणी माजी नागरी हवाई वाहतूकमंत्रीपदी प्रफुल्ल पटेल यांची ६ जून रोजी ईडीच्या कार्यालयात हजर राहण्यासाठी ईडीकडून समन्स बजावला आहे. पटेल युपीए सरकारच्या काळात नागरी हवाई वाहतूकमंत्रीपदी पटेल असताना आर्थिक स्थिती नसताना ७०,००० कोटी रुपये किंमतीच्या १११ विमानांची खरेदी, एअर इंडिया आणि इंडियन एअरलाइन्सचे विलीनीकरण, परकीय गुंतवणूकीतून प्रशिक्षण संस्था सुरु करणे तसेच आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असणारे काही हवाई मार्ग खासगी कंपन्यांना दिले होते.

या आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी हवाई वाहतूक उद्योगातील लॉबिस्ट दीपक तलवार याला काही महिन्यांपूर्वी अटक करण्यात केली असून दीपक तलवार हा सध्या तुरुंगात आहे. आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असणारे काही हवाई मार्ग तलवारने तीन आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांना मिळवून दिले होते. या मोबदल्यात तलवारला २००८- ०९ या कालावधीत २७२ कोटी रुपये मिळाले असा दावा ईडीने न्यायालयात केला होता. तलवार हा प्रफुल्ल पटेल यांचा चांगला मित्र होता, असे देखील न्यायालयाने म्हटले होते. त्यामुळे दीपक तलवारच्या अटकेनंतर पटेल यांची देखील चौकशी होणार आहे. तसेच प्रफुल्ल पटेल यांनी देखील आपण तपास यंत्रणेला सहकार्य करण्यास आनंदी असल्याचे म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पाकिस्तानमध्ये दिसणार भारतीय मालिका, चित्रपट

News Desk

पंतप्रधान यावर्षीही जवानांसोबत दिवाळी साजरी करणार

News Desk

अनिल देशमुखांना ईडीकडून तिसरं समन्स, चौकशीला हजर राहण्याचे आदेश

News Desk