HW News Marathi
महाराष्ट्र

पोलिसांच्या शिपाई पदासाठी इंजिनिअर आणि डॉक्टरांचे अर्ज

मुंबई | पालघर कोळगाव पोलीस परेड मैदानावर सध्या पोलीस भरतीसाठी शारीरिक चाचणी सुरू आहे. या भरतीसाठी जवळपास २० हजार उमेदवारांनी अर्ज भरला आहे. जिल्ह्यातील पोलीस शिपाईच्या १६० जागासाठी ३३ इंजिनिअर, ८ आयुर्वेदिक डॉक्टर, , बी. सी. एस., बी बी.एस.सी अॅग्री आणि बीएससीटेक असे उच्चशिक्षित तरुणांनी अर्ज भरले आहेत.

पोलीस भरती शारीरिक चाचणीसाठी पहाटे ४ वाजल्यापासून राज्याच्या कानाकोपऱ्यातून उमेदवार आले आहेत. बाहेर गावातून आलेल्या उमेदवारांसाठी मैदानावर स्टेडिअमध्ये आणि टेंटमध्ये राहण्याची सोय केली आहे. पोलीस मधील शिपाईच्या भरतीसाठी उच्चशिक्षित तरुण अर्ज भरतात. यावरुनच कळते की, देशात सुशिक्षित बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे साध्या शिपाई पदाच्या जागावर २० हजार उमेदवारांनी अर्ज भरले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“जाणीवपूर्वक माझ्या परिवाराला छळण्याचा प्रयत्न”, ईडीच्या समन्सवर एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया

News Desk

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘अहिंसा दौड’चा समारोप

Aprna

ठाण्यात वेहळोली वगळता अन्यत्र कुठेही बर्ड फ्लूची लागण नाही!

News Desk