मुंबई | महाराष्ट्रात सध्या मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात टाकलेल्या लेटर बॉम्बमुळे खळबळ उडाली आहे. अन्ल देशमुख यांनी सचिन वाझेला महिन्याला 100 कोटी रुपयांच्या वसुलीचं टार्गेट दिलं होतं, असा अत्यंत गंभीर आरोप परमबीर सिंग यांनी केला आहे.या पत्रावरूनच राज्यात गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा मागितला जात आहे तसेच राष्ट्रपती राजवटीची मागणी देखील होते आहे. अशा स्थितीत आता परमवीर सिंग यांनी थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयात आता याचिका दाखल करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रामध्ये त्यांनी जे आरोप केले आहेत. त्या आरोपांची चौकशी सर्वोच्च न्यायालयाने करण्याची मागणी परमवीर सिंग यांनी या याचिकेद्वारे केली आहे. या याचिकेत आपण केल्या सर्व आरोपांची चौकशी करावी. त्यासाठी सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात यावेत अशी मागणी केली आहे.परमबीर सिंग यांनी आपल्या याचिकेत म्हटल आहे की , “गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भ्रष्टाचाराबाबत मी केलेल्या तक्रारीची निप:क्ष, प्रभावहीन आणि कोणतीही बाजू न घेता चौकशी व्हावी. पुरावे नष्ट होण्यापूर्वी याची सतत्या तपासणे आवश्यक आहे.”त्यामुळे आता गृहमंत्री अनिल देशमखांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
Former Mumbai Police Commissioner Param Bir Singh files a petition before the Supreme court about his transfer to Home Guard Department.
(File photo) pic.twitter.com/Q7Wce4HN2o
— ANI (@ANI) March 22, 2021
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.