HW News Marathi
महाराष्ट्र

अधिकारांचा अतिरेक – शरद पवार

पुणे। एखाद्या व्यक्तीविषयी शंका आल्यास त्याची चौकशी करण्याचा अधिकार तपास यंत्रणांना आहे. अजित पवार यांच्या निकटवर्तीयांच्या निवासस्थानी छापे टाकण्याचा प्रकार म्हणजे अधिकाराचा गैरवापर आहे. उत्तर प्रदेशातील हिंसाचारानंतर मी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. त्या रागातून सत्ताधाऱ्यांनी ही कारवाई केली असावी, अशी शक्यता नाकारता येत नाही, असे ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी सांगितले. तपास यंत्रणांचा गैरवापर आणखी किती काळ सहन करायचा, हे आता नागरिकांनी ठरवावे, असा सवालही पवार यांनी उपस्थित केला.

हा प्रकार म्हणजे अधिकारांचा अतिरेक

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीयांवर प्राप्तिकर विभागाकडून कारवाई करण्यात आली. त्यानंतर शरद पवार यांनी बारामतीतील गोविंदबागेत गुरुवारी पत्रकारांशी संवाद साधला. उत्तरप्रदेशात शेतक ऱ्यांच्या अंगावर वाहन घालण्यात आले. त्यानंतर मी या प्रकाराची तुलना जालियानवाला बागेतील हत्याकांडाशी केली. त्या प्रतिक्रियेमुळे सत्ताधाऱ्यांना राग आल्याने त्यांनी अजित पवार यांच्या निकटवर्तीयांवर कारवाई केली असावी, असे त्यांनी नमूद केले. तपास यंत्रणांना चौकशी करण्याचा पूर्ण अधिकार आहे. मात्र, अजित पवार यांच्या निकटवर्तीयांच्या निवासस्थानांवर छापे टाकणे, हा प्रकार म्हणजे अधिकारांचा अतिरेक आहे.

केंद्रीय तपास यंत्रणा कारवाई करतात, ही आक्षेपार्ह बाब

काही जण पत्रकार परिषद घेऊन आरोप करतात. त्यानंतर लगेचच केंद्रीय तपास यंत्रणा कारवाई करतात, ही आक्षेपार्ह बाब आहे. मुंबईतील एका बोटीवर कारवाई करून अमली पदार्थ जप्त करण्यात आले. आरोपींना काही जण घेऊन जात होते. त्यांना साक्षीदार म्हणून बोलावण्यात आले होते. मात्र, साक्षीदार म्हणून बोलाविण्यात आलेल्या व्यक्तींनी आरोपींना ताब्यात घेऊन जाणे ही बाब योग्य नाही. साक्षीदारांना एखादी घटना पाहण्यासाठी किंवा न्यायालयात साक्ष देण्यासाठी बोलावले जाते. कारवाईत काही पक्षातील कार्यकत्र्यांना सामावून घेण्यात आले होते. अमली पदार्थ प्रक रणी कारवाई योग्य आहे. मात्र, ती अशा पद्धतीने होता कामा नये, असे त्यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नाना पटोलेंच्या आरोपांवर अजित पवार भडकले?

News Desk

सामाजिक कार्यकर्त्या ॲड. अपर्णा रामतीर्थकर यांचे निधन

News Desk

मराठवाड्याच्या हितासाठी धनंजय, पंकजा एकत्र ?

News Desk