HW News Marathi
महाराष्ट्र

गडकरींच्या फार्म हाऊसवर स्फोट, एकाचा मृत्यू

नागपूर | हळद उकळण्याच्या बॉयलरचा स्फोट झाल्याने नितीन गडकरींच्या फार्म हाऊसवर एका मजूराचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या धापेवडा येथील फार्महाऊसवर बॉयलरचा स्फोट झाल्याने एका मजूराचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर काही मजूर जखमी झाल्याचे वृत्त आहे.

ही घटना मंगळवारी संध्याकाळी ६ च्या सुमारास घडली. नितीन गडकरी यांची पत्नी कांचन गडकरी यांच्या मालकीची कांचन इंडिया ही सौंदर्य प्रसाधन कंपनी आहे. या कंपनीसाठी आवश्यक असणारे उत्पादन गडकरी त्यांच्या फार्महाऊस परिसरात घेतले जाते. त्या ठिकाणी हळदी उकळण्यासाठी एक बॉयलर असून त्या ठिकाणी अनेक कामगार या ठिकाणी काम करतात.

मंगळवारी सायंकाळी अचानक हळद उकळण्याच्या बॉयलरचा स्फोट झाला व त्यात एक मजूर मृत्यूमुखी पडला. त्यावेळी कांचन गडकरी घटनास्थळी उपस्थित होत्या अशी माहिती सुत्रांकडून प्राप्त झाली आहे. यासंदर्भातील वृत्ताला कलमेश्वरच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी दुजोरा दिला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपचे महानगरपालिकेसाठी जबाबदारीचे वाटप, आशिष शेलारांची नवी मुंबईच्या प्रभारी पदी निवड

News Desk

महाराष्ट्राची लेक UPSC मध्ये देशात चौथ्या क्रमवार!

News Desk

“…तर नारायण राणेंची अटक ही बेकायदेशीरच मानायला हवी”

News Desk