HW News Marathi
राजकारण

फडणवीसांनी विरोधकांची ‘मळमळ’ काढली, नेमकं काय म्हणाले?

नागपूर | ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश राज्यपालांनी रोखल्यानंतर दैनिक सामनामधून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीका करण्यात आली होती. सामनामधून राज्यपालांवर करण्यात आलेली टीका ही दर्जाहीन टीका आहे. राज्यपालांच्या पदाचा सन्मान हा समजून घेतला पाहिजे. राज्यपालांनी चूक दाखवून दिली ती तुम्हाला सुधारुन घ्यावी लागली. यामुळे जी मळमळ आणि तळमळ दिसतेय ती या टीकेतून दिसतेय. अशा प्रकारे किती जहरी आणि घाणेरडी टीका केली तरी टीकाकारांची प्रवृत्ती दिसते. राज्यपालांवर आणि त्या संस्थेवर कोणताही परिणाम होत नाही, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी सामना आणि राज्यपालांवर टीका करणाऱ्यांना लगावला आहे

ओबीसी आरक्षणाच्या संदर्भातील जो काही अध्यादेश आहे पहिल्यांदा ज्या स्वरुपात पाठवला होता तसा मंजूर झाला असता तरी कोर्टात स्थगिती आली असती. राज्यपालांनी ती बाब समोर आल्यानंतर सरकारला सूचना केली. सरकारनं सुधारित अध्यादेश पाठवला, त्यासंदर्भात सुधारित माहिती माझ्याकडे नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. इम्पेरिकल डेटा संदर्भात केंद्र सरकारनं नकार दिला असता देवेंद्र फडणवीस यांनी तो इम्पेरिकल डेटा नसून तो सेन्सस डेटा आहे. त्यामुळे राज्य सरकारनं अध्यादेश काढला आहे. सुप्रीम कोर्टात केंद्रानं वेळ वाढवून मागितली नसून राज्य सरकारनं वेळ वाढवून घेतलीय, तुमची माहिती दुरुस्त करा, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

भाजप हा लढणारा पक्ष

नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांनी आमची भेट घेतली. राज्यसभेची जागा बिनवरोध करा अशी त्यांनी मागणी केली. 12 आमदारांचं निलबंन मागं घ्या अशी कोणतीही मागणी झाली नाही. भाजप हा सौदेबाजी करणारा पक्ष नसून लढणारा पक्ष आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तिहेरी तलाकच्या नव्या विधेयकावर आज लोकसभेत चर्चा

News Desk

…तर मग वाजपेयींनी महाभेसळीचे नेतृत्त्व केले काय ?

News Desk

उपोषण मागे, मराठा समाजाचा आंदोलन सुरूच

News Desk