मुंबई |संसदेच्या पावसाळी अधिवेशनात शेतकऱ्यांसंबंधीत विधेयक आणि कामगार सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आले होते. दरम्यान, या विधेयकाविरोधात शेतकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा हाती घेतला आहे. आज (२५ सप्टेंबर) शेतकऱ्यांनी भारत बंदची हाक देण्यात आली आहे. दरम्यान, महाविकास आघाडी सरकारनेही या विधेयकाला विरोध केला आहे. याच पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रात शेतकरी विधेयक आणि कामगार सुधारणा विधेयक लागू होणार नसल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली आहे. पुण्यात ते पत्रकारांशी बोलत होते.
‘आम्ही सध्या कायदेशीर अभ्यास करत आहोत, ही बिले घाईत मंजूर झाली आहेत. आम्ही राज्यात याची अंमलबजावणी न करण्याचा निर्णय घेऊ. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडूनही या बिलाचा विरोध केला जात आहे.’ तसेच, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही याबाबत माहिती दिली आहे.
We oppose #FarmBills passed by the Parliament. Maharashtra Vikas Aghadi is also against it. We will decide not to implement it in the State: Maharashtra Congress President and State Minister Balasaheb Thorat (file pic) pic.twitter.com/uqD1pRbJqi
— ANI (@ANI) September 25, 2020
या विधेयकाला शेतकरीविरोधी कायदा असे संबोधून शेतकरी संघटनांकडून घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनाला स्वाभिमानी शेतकरी संघटना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि अखिल भारतीय किसान सभेने पाठिंबा दर्शवला आहे. तर कोल्हापुरातही राजू शेट्टी यांनी बिलाची प्रत जाळली.दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की एनडीए सरकारने पिकांच्या एमएसपी वाढीसंदर्भात इतिहास रचला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.