HW News Marathi
महाराष्ट्र

व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची अडवणूक, फसवणूक

नांदेड | खरीप हंगाम-२०१७ मध्ये नांदेड जिल्ह्यातील ७ लाख ७२ हजार ५७५ हेक्टर खरीप क्षेत्रात प्रस्तावीत पेरणीसाठी रासायनीक खते व बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्धता होणार असून हे वाटवात शेतक-यांना अडचण येणार नाही याची खबरदारी कृषिनिविष्ठा संनियंत्रण यंत्रणेने घ्यावी अशा सुचना जिल्हास्तरीय कृषिनिविष्ठा संनियंत्रण समितीची बैठकीत जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिल्या. नांदेड जिल्हा परिषदेच्या कै.शंकरराव चव्हाण सभागृहात १९ मे २०१७ रोजी जिल्हाधिकारी अरण डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली व जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे यांच्या प्रमुख उपस्थितीत खरीप हंगाम-२०१७ जिल्हास्तरीय कृषिनिविष्ठा संनियंत्रण समितीची बैठक संपन्न झाली.

या बैठकीत जिल्हाधिकारी अरुण डोंगरे म्हणाले की, शेतकऱ्यांना रासायनिक खत वाटपात कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही याची खबरदारी घ्यावी. कृषिनिविष्ठा संबंधी व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची अडवणूक, फसवणूक झाल्यास त्यांच्यावर कडक कार्यवाही करण्यात येईल. जे विक्रेते नियमानुसार चांगल्या प्रकारे कृषिनिविष्ठा वाटप करतील त्यांच्या पाठिशी प्रशासन खंबीरपणे उभे राहील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. कृषिनिविष्ठा केंद्रधारकांनी ई-पॉस (e-Pos) मशिन वापराबाबतचे प्रशिक्षण घेऊन त्यांच्या सर्व शंकाचे निरसन करुन घ्यावे. रासायनिक खताची विक्री ई-पॉस (e-Pos) मशिनद्वारे योग्य दरात करण्यात यावी, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

जि.प. कृषि विकास अधिकारी पंडीत मोरे यांनी जिल्हयाची सर्वसाधारण माहिती तसेच खरीप हंगाम २०१७ मध्ये प्रस्तावीत पीक निहाय पेरणी ज्यामध्ये ज्वारी- ७० हजार हेक्टर, तुर- ७८ हजार हेक्टर, सोयाबीन- २ लाख ८३ हजार हेक्टर व कापूस- २ लाख ६५ हजार हेक्टर व इतर पिके ७६ हजार ५७५ हेक्टर असे एकूण ७ लाख ७२ हजार ५७५ हेक्टर प्रस्तावीत पेरणी अपेक्षीत असून त्यासाठी लागणारे बियाणे पुरेश्या प्रमाणात उपलब्ध होणार असल्याची माहिती दिली. खरीप हंगाम २०१७ करीता आवश्यक असणाऱ्या रासायनीक खताची मुबलक प्रमाणात उपलब्धता होणार असून रासायनिक खताबाबत टंचाई भासणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

खरीप हंगामासाठी जिल्हा व तालुकास्तरावर भरारी पथकाची स्थापना तसेच निविष्ठा उपलब्धतेबाबत नियंत्रण कक्ष, विक्री केंद्रावर शासनाचे टोल फ्री क्रमांक, भरारी पथक क्रमांकाचे फ्लेक्स लावण्यात येत आहेत. शेतकऱ्यांना बियाणे, रासायनिक खते उपलब्धता, दर्जा तसेच अडचणीबाबत याचा उपयोग होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

गुरुवार १ जून २०१७ पासून रासायनिक खताची विक्री e-Pos मशिन द्वारे होणार असून त्यासाठी पालकमंत्री, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तसेच तालुकास्तरीय खत विक्रेत्यांच्या बैठका घेऊन मार्गदर्शन करण्यात आले आहे, अशी माहिती दिली. e-Pos मशिनचे सविस्तर प्रशिक्षणही आयोजित करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण १९ व २० मे २०१७ रोजी दोन सत्रामध्ये प्रतिसत्र चार तालुक्याप्रमाणे आज नांदेड, मुदखेड, अर्धापूर, नायगाव, कंधार, लोहा, धर्माबाद व उमरी तसेच २० मे रोजी भोकर, देगलूर, मुखेड, बिलोली, किनवट, माहूर , हिमायतनगर, हदगाव असे अयोजीत करण्यात आले आहे. याचा खत विक्रेत्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कृषि विकास अधिकारी मोरे यांनी केले.

बैठकीस जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयाचे संदीप गुरमे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयाचे मझरोद्यीन, सहाय्यक प्रकल्प संचालक डॉ. पी. पी. घुले, महाबीजचे व्यवस्थापक पी. टी. देशमुख, कृषि उद्योग विकास महामंडळाचे श्री. राचलवाड, संघटनेचे प्रतिनिधी दिवाकर वैद्य, जुगल किशोर अग्रवाल, खत कंपनीचे प्रतिनिधी, खत विक्रेते आदी उपस्थित होते. मोहीम अधिकारी ए.जी. हांडे यांनी आभार मानले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

 ‘जनता प्रचंड अस्वस्थ आहे, चिडली आहे त्याचा उद्रेक होऊ नये म्हणून लॉकडाऊनची भिती दाखवली जात आहे’, मनसेचा मुख्यमंत्र्यावर घणाघात

News Desk

“आजही माझं प्रामाणिक मत, माझं मत मी बदलणार नाही”- विक्रम गोखले

News Desk

ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार, उद्या ‘हे’ मंत्री घेणार शपथ

News Desk