नवी दिल्ली | नव्या कृषी विधेयकावरुन आज (२५ सप्टेंबर) शेतकरी संघटनांनी देशव्यापी बंद पुकारला आहे. विविध शेतकरी संघटनांनी अखिल किसान संघर्ष समन्वय समिती, अखिल भारतीय शेतकरी संघटना, भारतीय किसान संघटना, अखिल भारतीय किसान महासंघ या देशभरातील संघटनांनी नव्या कृषी विधेयकावर राग व्यक्त करीत आंदोलन पुकारले आहे.
विविध शेतकरी संघटनांची अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती, अखिल भारतीय शेतकरी संघटना, भारतीय किसान संघटना, अखिल भारतीय किसान महासंघ या देशव्यापी संघटनांनी भारत बंदची हाक दिली आहे. या आंदोलनात ३०हून अधिक शेतकरी संघटना सहभागी होणार आहेत. याशिवाय, सीटू, हिंद मजदूर सभा, नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस आदी १० कामगार संघटनांनीही पाठिंबा दिला आहे. या संघटनाही बंदमध्ये सहभागी होणार आहेत.
कृषी विधेयके राज्यसभेत मंजुरीला आल्यापासून उत्तर भारतात शेतकऱ्यांकडून तीव्र आंदोलन करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांकडून राष्ट्रीय महामार्ग रोखून धरले जात आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षानेही केंद्राच्या धोरणांविरोधात काँग्रेसने पुढील दोन महिने जनआंदोलन करण्याचे ठरवले आहे. त्याअंतर्गत देशभर पत्रकार परिषदा घेऊन शेतकऱ्यांची बाजू मांडली जाईल. काँग्रेससह १५ विरोधी पक्षांनीही या शेती विधेयकांना विरोध केला असून राष्ट्रपतींना या विधेयकांवर स्वाक्षरी न करता ती परत पाठवण्याची विनंती केली आहे.
Punjab: Kisan Mazdoor Sangharsh Committee continues their 'rail roko' agitation in Amritsar, in protest against the #FarmBills.
The Committee is holding the 'rail roko' agitation from September 24 to 26 against the Bills. pic.twitter.com/NFfSCcWuO5
— ANI (@ANI) September 25, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.