HW News Marathi
महाराष्ट्र

मुंबईतून हुसकवलेले फेरीवाले कल्याण डोंबिवलीत

डोंबिवली | कल्याण-डोंबिवलीत सध्या फेरीवाल्यांचा सुळसुळाट पहायला मिळतोय. कल्याण व डोंबिवली स्टेशन परिसरांतील मुख्य रस्त्यांच्या बाजूला आणि पदपथांवरफेरीवाल्यांनी दुकान थाटले आहे.

डोंबिवलीत आयरे, कोपर भागात हे फेरीवाले स्वस्तात भाड्याच्या घरामध्ये रहायचे आणि व्यवसाय करायचे असा प्रकार अनेक फेरीवाल्यांनी सुरू केला. सर्वाधिक फेरीवाले डोंबिवलीपूर्वेतीलनेहरू मार्ग, फडके मार्ग, उर्सेकरवाडी, चिमणीगल्ली, कामत मेडिकल पदपथ भागात दिसून येतात. या अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचा इशारा मनपाआयुक्त गोविंद बोडके यांनी दिला आहे.

महानगर पालिका फेरीवाल्यांना हुसकावण्याचा प्रयत्न करत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरुन रान पेटविले होते. फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरुन परप्रांतीयांवर हल्ला केला होता. परप्रांतीय मुद्दावरुन अनेक राजकारण झाले होते. काही दिवस फेरीवाल्यांना हुसकावण्यात यश आले. पण, पुन्हा फेरीवाले जैसे थे…..!

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

देश हिंदुत्वाच्या विचाराने नाही तर गांधी विचाराने चालेल! – नाना पटोले

Aprna

अजित पवारांनी उलगडलं सकाळी काम करण्याच्या स्टाईलचे रहस्य…!

News Desk

‘मंदा म्हात्रेंच्या विधानावर आता चंद्रकांत पाटलांचं उत्तर! म्हणाले….’

News Desk
देश / विदेश

काश्मीरमध्ये पाकिस्तानचे ४ प्रशिक्षित दहशतवादी, गुप्तचर यंत्रणांची माहिती

Gauri Tilekar

श्रीनगर | काश्मीरमध्ये पाकिस्तानचे ४ प्रशिक्षित दहशतवादी सक्रिय असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सप्टेंबरमध्ये जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे दहशतवादी दोन गटांमध्ये काश्मीरमध्ये आले. या गटांमध्ये एकूण ४ प्रशिक्षित दहशतवादी आहेत, अशी माहिती गुप्तचर यंत्रणांनी सुरक्षा दलांना दिली आहे. आयएसआयने या दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिल्याचे देखील म्हटले जात आहे.

काहीच दिवसांपूर्वी काश्मीरमध्ये भारतीय जवानांवर झाला होता. या हल्ल्यापासूनच हे स्नायपर्स काश्मीरमध्ये सक्रिय असल्याची माहिती मिळत आहे. या स्नायपर्सकडे एम-४ कार्बाइन्स रायफल्स आहेत. या रायफल्सच्या साहाय्याने डोंगरातून हल्ले करणे सोपे जाते.

Related posts

आम्ही दिवे तर लावू, मात्र तुम्ही तज्ज्ञांचे एकदा तरी ऐकावे

swarit

हाथरस प्रकरणाची पुढील सुनावणी २ नोव्हेंबरला

News Desk

आरक्षणांबाबत केंद्राची भूमिका नकारात्मक! – अशोक चव्हाण

News Desk