मुंबई। गेल्या अनेक दिवसांपासून राज्याचे राजकारण वेगवेगळ्या कारणांनी ढवळून निघाल आहे. आणि त्यात विशेषतः आर्यन खान या प्रकरणामुळे वातावरण चांगलेच तापले या प्रकरणाला रोज नवनवीन वळण मिळताना दिसत आहे. आता ज्येष्ठ वकील कनिष्ठ जयंत यांनी थेट समीर वानखेडेंसह सहा जणांवर अपहरण आणि खंडणी वसुलीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. जयंत यांनी तसा तक्रार अर्जच पोलिसांना दिला आहे. त्यामुळे वानखेडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. म्हणून आता भाजप आणि समीर वानखेडे काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागल आहे.
अॅड. कनिष्ठ जयंत काय म्हणाले?
अॅड. कनिष्ठ जयंत यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली आहे. आर्यन खान क्रुझ प्रकरणातील मी एक तक्रारदार आहे. 12 आणि 16 ऑक्टोबर या दोन तारखांना आर्यन खान क्रुझ प्रकरणात केपी गोसावी, मनिष भानुशाली, ऋषभ सचदेवा, प्रतिक गाभा, आणि अमीर फर्निचरवाला यांच्याविरोधात मी तक्रार दिली आहे. या लोकांनी संघटीतपणे एकत्र येऊन कट कारस्थान करून आर्यन खानचं अपहरण केलं आणि कोट्यावधी रुपयांची खंडणी त्याच्या सुपरस्टार वडिलांकडून मागितली. अशा स्वरुपाची लेखी तक्रार अर्ज मी दाखल केला आहे. एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांची या सर्व प्रकरणात भूमिका महत्त्वाची आहे. या पाचही लोकांना वानखेडे यांनी खंडणी उकळण्यास आणि अपहरण करण्यास पाठबळ दिल्याचंही या तक्रारीत म्हटलं आहे. एका प्रकारे फिल्म इंडस्ट्रिजवर दबाव आणण्यासाठी अधिकाराचा गैरवापर करण्यात आला आहे, अशा स्वरुपाची तक्रार करण्यात आल्याचं आता समोर आल आहे. म्हणूनच समीर वानखेडे यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.माता रमाबाई पोलिस ठाणे, यलोगेट पोलिस ठाणे व स्वत: मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांच्याकडे ही तक्रार करण्यात आली आहे.
प्रभाकर साईलला संरक्षण देण्याची शक्यता
आज सकाळी प्रभाकर साईल संरक्षणासाठी मुंबई पोलिसात धाव घेणार असल्याचे समोर आले होते. त्यानुसार आता प्रभाकर साईल मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयात दाखल झाला आहे. माझ्या जीवाला धोका आहे. मला समीर वानखेडेची भीती वाटतेय. मला संरक्षण देण्यात यावी या मागणीसाठी एनसीबीचा पंच प्रभाकर साईल मुंबई पोलीसात गेला आहे. मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे हे प्रभाकर साईलची तक्रार घेऊन संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून प्रभाकर साईलला संरक्षण देण्याची शक्यता आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.