HW News Marathi
Covid-19

अखेर सापडले ! ‘डेक्सामेथासोन’ औषध ‘कोरोना’वर ठरतेय सर्वात प्रभावी

नवी दिल्ली | संपूर्ण जग सध्या कोरोनाविरुद्धची लढाई लढत आहे. जगभरातील हजारोंनी कोरोनावर यशस्वी मात केली तसेच हजारोंनी आपला जीवही गमावला आहे. संपूर्ण जग सध्या या अत्यंत कठीण स्थितीचा सामना करत असताना आता एक अत्यंत दिलासादायक बातमी येत आहे. शास्त्रज्ञांनी कोरोनावर प्रभावी ठरणारे एक शोधून काढल्याचा दावा करण्या येत आहे. ‘डेक्सामेथासोन’ असे कोरोनावर प्रभावी ठरणाऱ्या या औषधाचे नाव आहे. ‘रॉयटर्स’ या वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त दिले आहे.

कोरोनामुळे गंभीर स्थिती असणाऱ्या रुग्णाची प्रकृती नियंत्रणात आणण्यास, त्या रुग्णाचे प्राण वाचविण्यास डेक्सामेथासोन हे औषध परिणामकारण ठरत असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे, या औषधामुळे कोरोना मृत्युदर नियंत्रणात आणणे देखील शक्य असल्याचे म्हटले जात आहे. माहितीनुसार, डेक्सामेथासोन या औषधाचा मर्यादित प्रमाणातही डोस दिल्यास कोरोनाच्या गंभीर स्थिती असलेल्या तीन रुग्णांपैकी एका रुग्णाचा प्राण वाचविण्यात यश येऊ शकते, असा शास्त्रज्ञांचा निष्कर्ष सांगतो.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोनाच्या काळात राजकरण नको!

News Desk

ठाकरे सरकारने एक दमडीचेही पॅकेज दिले नाही, अंग चोरुन काम करते !

News Desk

देवाच्या कृपेने मला कोरोना झाला नाही – अनिल देशमुख

News Desk