HW News Marathi
Covid-19

जाणून घ्या…भाजपकडून विधान परिषदेचे उमेदवारी मिळालेल्या रमेश कराड यांच्याबद्दल

मुंबई | विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सर्व पक्षांतील उमेदवारांनी काल (११ मे) उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजपने विधानपरिषदेच्या निवडणुकीत डॉ. अजित गोपछडे, प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब करण्यात आले होता. मात्र, भाजपने चौथा उमेदवार बदलला आहे. डॉ. अजित गोपछडे यांनी आपली उमेदवारी मागे घेतली असून डमी उमेदवार म्हणून अर्ज भरलेल्या रमेश कराड भाजपचे चौथे उमेदवार दिली आहे.

रमेश कराड हे नाव कुठेही नसताना त्यांनी भाजपने उमेदवारी दिल्याने चर्चेचा विषय झाले आहे. मात्र, रमेश कराड कोण आहेत हे कोणला माहित नाही. रमेश कराड यांनी ३ वर्षापूर्वी राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेचा अर्ज भरला होता. मात्र, ऐन निवडणुकीच्या वेळी त्यांनी अर्ज मागे घेत, धनंजय मुडेंना विधानपरिषदेवर संधी देण्यात आली होती. यानंतर नाराज रमेश कराड हे भाजपमध्ये येवून पंकजा मुंडेंच्या गटात सामील झाले. यानंतर कराड यांनी सुरेश धस यांच्यासाठी देखील काम केले.

लातूर ग्रामीण मतदान संघातून ते विधानसभेच्या निवडणुकीसाठी इच्छुक होते. मात्र, ऐन वेळी विधानसभेच्या निवडणुकीत हा मतदारसंघत शिवसेनेच्या वाटेला गेला होता. यानंतर अखेर रमेश कराड यांना विधान परिषदेतून आमदार होण्याची संधी मिळाली आहे. रमेश कराड हे लातूर जिल्हा बँकेची निवडणूक नाणेफेकीत हरले.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नितीन गडकरींच्या पुढाकारामुळे नागरपूरमधील ‘रेमडीसिविर’च्या तुटवड्याचा प्रश्न सुटला

News Desk

कोरोनापासून वाचण्यासाठी गोवा पॅटर्न अवलंबावा

News Desk

फक्त राजकारण आणि महाराष्ट्र द्रोह | जितेंद्र आव्हाड

News Desk