पुणे | पुण्यातील कॅम्प परिसरातील फॅशन स्ट्रीट मार्केटमध्ये आज लागली होती. ही आग तब्बल ३ तासांनी आटोक्यात आली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र यात फॅशन स्ट्रीट मार्केटमधील तब्बल ८०० दुकानं आगीच्या कचाट्यात सापडली आहे. तसेच या आगीमुळे व्यापारांचे करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे.
Maharashtra: Fire breaks out at Fashion Street market in Camp area of Pune. Fire tenders rushed to the spot. More details awaited. pic.twitter.com/EMepVu2TdE
— ANI (@ANI) March 26, 2021
पुण्याच्या कॅम्प परिसरात असणाऱ्या फॅशन स्ट्रीट मार्केटमध्ये रात्रीच्या सुमारास भीषण आग झाली. ही आग नक्की कशामुळे लागली याची अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पण या ठिकाणी कपड्याची मोठी दुकाने आणि गोदामं असल्याने ती आग पसरली.
या दुर्घटनेनंतर तात्काळ अग्निशमन दलाला याची माहिती देण्यात आली. त्यानंतर ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या १६ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. फॅशन स्ट्रीटचा भाग अत्यंत अरुंद रस्त्यांचा असल्याने अग्निशमन दलाला ही आग विझवण्यासाठी मोठी कसरत करावी लागली.
या दुर्घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, फॅशन स्ट्रीटचा परिसरात कपड्यांची अनेक दुकानं, गोदाम असल्याने त्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. दरम्यान ही आग नेमकी कशी लागली? किती वाजता लागली? याची अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
Fire has been controlled. No casualty has been reported so far but heavy loss to the hawkers & shop owners as their shops were gutted in fire: Fire Department, Pune #Maharashtra
— ANI (@ANI) March 26, 2021
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.