ठाणे | संपूर्ण राज्य कोरोनाच्या संकटाशी लढत असताना दुसरीकडे राज्यातील रुग्णालयांमध्ये अपघातांची मालिका सुरूच आहे. नाशिक आणि विरार येथील रुग्णालयांमध्ये घडलेल्या दुर्घटनांनंतर आता ठाणे जिल्ह्यातही दुर्घटना घडली आहे. मुंब्रा कौसा येथील प्राइम क्रिटीकेअर या हॉस्पिटलला लागलेल्या आगीत ४ जणांचा मृत्यू झाला आहे.
आज (२८ एप्रिल) पहाटे पावणे चारच्या सुमारास ही आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हॉस्पिटलच्या पहिल्या मजल्यावर ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. आगीची घटना घडली तेव्हा रुग्णालयात एकूण २० रुग्ण होते. यापैकी सहा जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते.
आग लागल्यानंतर २० रुग्णांना बाहेर काढण्यात यश आलं. आयसीयूतील सहा रुग्णांना बिलाल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं होतं. त्यातील चार जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे, अशी माहिती ठाणे महापालिकेनं दिली आहे.
मुंब्रा कळवा मतदारसंघाचे आमदार आणि गृहमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी घटनेबद्दल माध्यमांशी बोलताना माहिती दिली. आगीत रुग्णालयाचा पहिला मजला जळला असून, यात तीन रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात आली असल्याचंही आव्हाड यांनी सांगितलं. मृतांच्या वारसांना पाच लाख, तर जखमींना एक लाख रुपये मदत दिली जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
रुग्णालयात कोरोना व्यतिरिक्त इतर व्याधी असणारे रुग्ण उपचार घेत होते. राज्यात मागील काही महिन्यांपासून रुग्णालयात आग लागण्यासह इतर दुर्घटना घडल्या आहेत. भंडाऱ्यातील घटनेपासून हे सत्र सुरू असून, नागपूरमध्ये एका रुग्णालयाला आग लागून दहा रुग्णांचा मृत्यू झाला होता. तर त्यापाठोपाठ मुंबईतही आग लागून रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या. नाशिकमध्येही ऑक्सिजनच्या टाकीला गळती लागल्याने २४ रुग्णांना प्राण गमवावे लागले होते.
Today at around 03:40 am fire broke out at Prime Criticare Hospital in Mumbra, Thane. Two fire engines & one rescue vehicle are at the spot. Fire extinguishing underway. Four dead during shifting of patients to another hospital: Thane Municipal Corporation#Maharashtra pic.twitter.com/QR4NNYZd8Y
— ANI (@ANI) April 28, 2021
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.