मुंबई | जगावर ओढवलेल्या कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी संपूर्ण देश प्रयत्न करत आहेत. यात मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स उद्योग समुहाने देखील कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी काही पावले उचलली आहेत. रिलायन्सने दोन आठवड्यांच्या अत्यंत कमी कालावधीत १०० बेडची क्षमता असलेले भारतातील पहिल्या कोरोना समर्पित केंद्रांची उभारणी केली आहे. मुंबई महापालिकेच्या मदतीने सर एच. एन. रिलायन्स फाऊंडेशनने मुंबईच्या सेव्हन हिल्स रुग्णालयात १०० बेडची क्षमता असलेलं केंद्र सुरू केले आहे. देशातील हे कोरोना समर्पित पहिले केंद्र असून यासाठीचा सर्व खर्च रिलायन्सकडून केला जाणार आहे.
या केंद्रावर निगेटिव्ह प्रेशर रुम तयार करण्यात आल्या आहेत, ज्यामुळे कोरोनाचा संसर्ग होणार नाही आणि बाधितांची संख्या रोखण्यासही मदत होईल. रिलायन्स कंपनीने पत्रकाद्वारे याची माहिती दिली आहे. सर्व बेड हे आवश्यक साहित्यांसह उपलब्ध आहेत. व्हेंटिलेटर्स, पेसमेकर्स, डायलॅसिस मशिन आणि पेशंट मॉनिटरिंग साहित्यही उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. दरम्यान, परदेशातून आलेल्या व्यक्तींना क्वॉरंटाईनमध्ये ठेवले जात आहे. यासाठी सर एच. एन. रिलायन्स फाऊंडेशनने विशेष वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देण्याचीही तयारी दाखवली आहे.
यामुळे विलगीकरणासाठी आवश्यक असलेल्या सर्व सोय़ी सुविधा तातडीने मिळतील आणि रुग्णांवर चांगल्या पद्धतीने उपचार केले जातील, असा विश्वास रिलायन्सकडून सरकारला देण्यात आला आहे. रिलायन्स लाईफ सायन्सकडून कोरोनाच्या चाचणीसाठी लागणारे आवश्यक किट्स आणि साहित्य आयात केली जात आहेत. रिलायन्सचे डॉक्टर आणि संशोधक ओव्हर टाइम करुन या जीवघेण्या व्हायरसविरोधात लढा देत आहेत, अशी माहिती कंपनीने दिली आहे.
India’s First Dedicated Covid Hospital by @RFhospital in collaboration with Brihanmumbai Municipal Corporation (BMC), has set up a dedicated 100 bedded centre at Seven Hills Hospital, Mumbai for patients who test positive for Covid-19. #CoronaHaregaIndiaJeetega
— Reliance Foundation (@ril_foundation) March 23, 2020
रिलायन्सकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला ५ कोटींची मदत
कोरोनासाठी राज्यकडे पुरेसा निधी आहे अशी माहिती काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली होती. दरम्यान, रिलायन्स इंडस्ट्रिकडून कोरोना व्हायरसविरोधात मुख्यंमंत्र्यांच्या सहाय्यता निधीतीत भर म्हणून रिलायन्सने ५ कोटींची मदत जाहिर केली आहे. तसेच, रोज १ लाख मास्कही पुरवण्यात येणार आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.